ए तू कधी ऋतुबदल अनुभवलंय?..रिमझिमणार्या पहाटेची सवय होतेय न होतेय तोच एका पहाटे अचानक हा पाउस जाऊन हलक्याश्या धुक्याने होणारं स्वागत अनुभवलंय? गणपती-नवरात्रीच्या धामधुमीत दमलेलं अन पहाटेच्या गारव्यात शांत गाढ झोपलेलं शहर अनुभवलंय? नाही? मग अनुभव हे.. सगळेच बदल जीवघेणे नसतात रे....
Whts on ur mind? हम्म... रोज वाटतं रे ह्या मनाशी किमान एकदातरी संवाद साधावा..विचारावं त्याला की बाबारे हे जे काय मी करतेय ते तुला पटतयं नं... तर्काने घेतलेले निर्णय भावनेला मान्य नसतीलही कदाचित पण त्यात नेमकं काय खटकतंय हे तरी कळावं... पण... हम्म हा पण मध्ये येतोच भीतीचं वावटळ घेउन... अन् मग नाहीच होत धीर मनाची चाचपणी करायचा.....उत्तरं माहीत असलेले प्रश्न नेहमीच असे टाळायचे असतात हो नं?
कहते है भीड का एक चेहरा होता है...और अकेलेपन कि खामोशी... हम्म.. भीड में छुपा सन्नाटा भी कभी सून लिया करो यारो...शायद ये अकेलपन तब बोल पडे...
"ब्रूम ब्रूम"
"झु$$$$$म्म"
"बाबा अजून जोरात चालवा...ब्रूम ब्रूम"
"ये ये... मस्त बाबा.. बाबा आता त्या काकांना मागे टाका.. आपणच रेस जिंकणार"
बाबांच्या स्कूटरवर समोर उभी त्यांची चिमुरडी ...बाजारातल्या गच्च गर्दीत बाबांच्या स्कूटरला रेस लावायला सांगत होती .. त्यांना गाईड करत होती ... जेमतेम ९-१० वर्षांची लेक...अनुभवलंय हे कधी ? स्कूटरच्या पुढच्या चिंचोळ्या भागात आपला इवलासा फ्रोक सांभाळत ताठ उभं राहणं? एका हाताने ह्यांडल घट्ट पकडत दुसर्या हाताने डोळ्यावर येणारे केस सावरणं?दोन्ही बाजुंनी बाबांच्या आश्वासक हातांची साखळी आणि पाठीशी त्यांचं कवच असणं? ... थोडक्यात काय तर जगातली सगळ्यात सुखी, भाग्यवान, (अति)आत्मविश्वासू मुलगी होणं... अनुभवलंय?
कोणी नेमकं कुठे थांबायचं हे एकदा नक्की करायला हवं बयो आता...परतायचं आहेच म्हटल्यावर शेवटाची किमान भीती तरी जाइल गं... आणि निरर्थक तुडवल्या गेल्या वाटेचा कदाचित नवा अर्थही लागेल...सारा जर तरचा खेळ बघ.. पण तरीही थांबायला मात्र हवंय गं बयो आता... थांबायला हवंय
अजनबी?... तुम कहते हो तो बन जाते हैं..अजनबी.. वैसे भी अब जानने के लिये रहा ही क्या है... बस एक आखरी बात... जीन सवालों के गुंचे मे अपनी मासुमीयत समेटे बैठे हो क्या उसी सवालोंके साथ मेरे जवाब भी जोड दोगे?... अजनबी जो बन रहे हैं..कही ये सवाल जवाबोंकी लडी मे फिरसे दिल न अटक जायें..करोगे इतना? अपने लिये?
" घर काय फक्त तिचं आहे? नवरा असला तरी माझाही मुलगा आहे तो"
"अगं पण आपलं ठरलाय नं ह्यावेळी बाहेर पडायचं?"
"म्हणुन काय झालं? आणि रोज भटकतोच कि आपण निरर्थक..आज जरा कणकण होती म्हणूनच थांबले नं?"
"अगं पण तिची अडचण माहितेय नं तुला? क्लास असतो तिचा ह्या वेळात"
"अहो पण म्हणून आपण घराबाहेर का? जाऊ द्या तुम्ही तिचीच बाजू घेणार.. मी आता पुन्हा नाही जाणार त्या घरी.. आजच आपण आपल्या घरी जाऊ"
"कुठल्या घरी?कोणाच्या घरी जायचं गं? मुलाच्या ह्या फ्ल्याटसाठी गावाकडंचं घर विकलं विसरलीस?"सकाळी सकाळी बसस्टोपवर उभी असता कानावर पडलेला हा संवाद..तुटक तुटक ऐकू आलेला.. कारणं माहित नाही पण रोज ठराविक वेळी हे ५०-५५ वयाचं जोडपं न चुकता दिसतं इथे...-----------------------------------------------------------------ऑफिसला जाताना रक्षक चौकात आज जाम गर्दी.. आधीच उशीर झालेला आणि त्यात हि गर्दी.. चिडचिड नुसती.... ट्राफिक मध्ये अडकल्यावर सहज नजर आजूबाजूला वळली.. आणि कुतुहल जागं झालं.. साधारण १८-३० वयोगटातल्या मुलांच्या झुंडिच झुंडी.. खरं सांगते इतकी पोरं एकावेळी कॉलेज नंतर बघितलीच नव्हती..गर्दीचं कारण शोधता कळालं कि पोलिस भरती ची काही परीक्षा आहे... ट्राफिकमध्ये टाईमपास करता करता लक्ष त्या मुलांकडे गेलं... कोण कुठून कुठून आलेलं कोण जाणे.. पाठीवर स्याक...आणि हातात एक फॉर्म.. १००-५०० जागांसाठी २०००-२५०० हजार अप्लिकेशन...-----------------------------------------------------------------काय होतं ह्या डोळ्यात..काका काकुंच्या आणि ह्या हजारो मुलांच्या..अगतिकता.. परिस्थिती... स्वप्न... कि भविष्य... सगळचं अधांतरी...
काही नात्यांचे धागे असतात असेच सुटे सुटे .. एक बाजू मनात बांधलेली.. फार घट्ट नाही.. अन खूप वरवरची पण नाही... बस्स असणं महत्वाचं ठरतं काही नात्यांसाठी..... कधीतरी जुळून येण्याच्या अपेक्षेत आजही सुटीच राहिलेली काही अनामिक,समंजस नाती...
आज माझे बाबा रेटायर्ड होत आहेत... कमीतकमी ३० वर्षांची नोकरी करून.... इथे मला ३ वर्षात कंटाळा आलाय त्याच त्या कामाचा जागेचा... अन बाबांनी ३० वर्ष? कमाल आहे खरच.. सकाळी त्यांना विचारलं कसं वाटतय.. सुट्ल्यासारखं... आता खरी सुरुवात.. राहून गेलेलं सगळं करायची.... काय मस्त फ़िलिंग असेल नं ती.. but still yaar..30 yr job?