Thursday, March 27, 2014

विचार

घट्ट आवळल्या मुठीतून निसटत असतं रे जगणं... सतत ....अगदी कणाकणाने ....बघणार्यांना वाटत असतं की कसला हा मुर्खपणा? का हा अट्टाहास?  काय दडवलयं असं ह्या मुठीत? सरळ उघडायची मुठ...धरायची ओंजळ...अन् साठवायचं शक्य तितकं ....पण ..तुला सांगू ... कितीही आव आणला नं तरी ज्याची त्याला बरोबर जाणवते घट्ट  मिटलेली रिकामी मुठ अन् त्याच मुठीची ओंजळ करण्यातला फोलपणासुद्धा...सगळ्याच गोष्टींचं दान असं ओंजळीत नाही नं रे घेता येत

अनंत पळांची ही आवर्तनं अशीच सुरु राहणार रे .... ती  का कुणास चुकलीय......  जे इतक्या निकराने टाळतोय  ते परतून येणारच....  आवर्तनांची ही वर्तुळं एकातएक गुंतत गेली नं की मध्य गाठता येतो म्हणे ....तोवर मात्र धीर धरता यायला हवा....

खरंतर निस्वार्थी वगैरे नसतं रे कोणी.... किमान एका समाधानी क्षणाचा स्वार्थ तर असतोच नं दोन्ही पारड्यात...

नातं म्हणजे तुझ्या माझ्यात वाटून घेतलेले असंख्य क्षणच नं...मग ते शाश्वत असण्याचा अट्टाहास का ?..आत्ता ह्या घडीला तुझ्या माझ्यातून नकळत निसटून जाणार्या क्षणाशी नाही का नातं जोडता येणार....

एक अंत और एक शुरूवात के बिचोबीच...कभी बहती राहोंकी खामोशी ताकते....तो कभी बंद तालोंका शोर सुनती....एक शाम आजभी वही दरवाजेपे खडी है... सही वक्त के इंतजार मे..

नुकताच हातून निसटलेला व्यस्ततेचा एक तुकडा... अन् अवघ्या काळावर स्वस्थतेचं गारुड... शांत निवांत एकांत पुन्हा एकदा....अवघडलेला...  अविरत अस्वस्थ व्यस्ततेची ओढ लावणारा....