आताशा हे हळवेपण वरचेवरच छळायला लागलय...काही काळ-वेळ न बघाता मन उगाच अस्वस्थ..नकोनकोशी ती हुरहुर...आणि मग निर्णयाची ओढ..की शोध रे शेवटाचा? हे असं काही झालं नं की माझ्याही नकळत ओलावतात डोळ्यांच्या कडा..आणि फुरफुरणारं नाकं.. अगदीच रडायला वैगरे नाही रे येत तसं.. पण दिवसभर हा पाठलाग चुकवला तरी रात्री उशी भिजतेच...जराशीच हं...कारणांचा शोध अजुनही चालुच आहे..हो आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळही..पण कसं कोण जाणे ही वेडी संध्याकाळ उतरायला लागली नं की मलाच कळत जातं हा शोध...हा खेळ.. काही खरा नाही..खरंच काही असेल तर ते असतं फक्त एकटेपण..भरल्या घरातलं..गर्दीतलं..माझ्यातल्या मलाच खाणारं हे एकटेपण..हे एकटेपणही मोठं विचित्र रे..एकटं मुळी येताच येत नाही ह्याला...सोबतीला असतात असंख्य आठवणी, तुझ्या-माझ्या क्षणांच्या,विसरलेल्या त्या अलवार स्पर्शांच्या,अन् कधी कधी तर न बोललेल्या त्या मुक्या अबोल्याच्याही...आतापर्यंत सावरलेला हा खोटा खोटा मनाचा डोलारा कोसळतोच रे मग..अन् मग अवचित कधीतरी बांध फुटतो मनाचा..चढ्त्या रात्री मग उशाला असतो एकाकी चंद्र..चांदण्या रात्रीतही एकटा..अगदी आपल्यासारखा..की फक्त माझ्यासारखा... तुझा शोध तर अजुनही चालुच नं रे... जाउ दे कशाला पुन्हा तेच वाद..तेच प्रश्न...उत्तरं नसलेली..तसेही आताशा तुझे प्रश्नच बदलले सगळे.. तरी एक शेवट्चं... आजकाल हा हळवेपणा तुलाही छळतो का रे?
Saturday, February 25, 2012
Thursday, February 16, 2012
मनाचा खेळ
कधी कधी आपण स्वतःबद्दलच अनेक भ्रामक कल्पना करुन घेतो. मी सुंदर्, मी गुणी ते अगदी मी स्वर्थी, मी वाईटही.. अश्या टोकाच्या विचारांनी खरतर आपण आपल्यालाच गोंजारत असतो. आणि त्यला नेत असतो एका वेगळ्या जगात तेपण अगदी दुसर्या टोकाच्या जगात...खरतर काय् मिळतं ह्या सगळ्यातुन? मुळात मनाला असं फसवायचं का? कदाचित सतत समोर येणार्या प्रश्नांमधुन तेव्ढीच उसंत..पण ही खरच विश्रांती असते का? की असतो एक थांबा विरंगुळ्याचा पुढच्या अनेक संकटांना तोंड द्यायला ताकद आजमावायचा थांबा... म्हणजे आतापर्यंतचे सगळे प्रश्न संपले असं नाही नं होत.. मग त्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय?मनाला असं भुलवुन प्रश्न थोडीच संपतात न त्यांची उकल होते... हे सगळं राहतच मनाच्या तळाशी नेहमी साचलेल्या चिवट शेवाळा सारखं.. आजही मागे वळुन पाहिलं तर दिसतो विविधरंगांनी नटलेला भुतकाळ.... काळा रंग अगदीच नावाला बाकी सगळ कसं रंगबेरंगी..स्वतःच्याच मस्तीत रमलेला भुतकाळ..आणि समोर बघितलं की दिसतो मिट्ट् काळोखाचा भविष्यकाळ..वर्तमानात इतकं झटुनही भविष्य इतकं अंधारं कसं..पुन्हा प्रश्नच... सगळा गुंता होत जातो..ह्या समाजाचा, ह्या माणसांच्या गर्दिचा, ह्या प्रश्नांचा अन त्यांच्या न् सापडलेल्या उत्तरांचाही.. मग ह्या अशा आड्वळणावर थकतच मन् ..तसे त्याला मिळतात अनेक संकेत..भविष्याचे..भुतकाळाशी जोडलेल्या वर्तमानाचे आणि मग सुरु होतो पुन्हा खेळ ह्या संकेताचा पाठलागचा अन त्यातच ह्या वेड्या मनाला गोंजारण्याचा....

Subscribe to:
Comments (Atom)