जवळपास 6-7 वर्ष झालीत आता घरापासुन दुर येउन.. आधी शिक्षण,मग नोकरी... चालायचचं..कुछ पाने के लिये कुछ खोना भी तो पडता ही है.. पण इतक्या वर्षांनंतर आजही जेव्हा घरुन निघते तेव्हा माझ्यातलं काहीतरी मागेच रहिल्याचं जाणवतं... गावाची हद्द ओलांडताना मागे वळुन पाहणं मी सहसा टाळते.. उगाच पाय अडखळला तर... पण पुदच्याच वळणावर हटकुन मागे बघितलं जातं.. डोळाभरुन हे माझं हक्काचं गाव मनात भरुन घेण्यासाठी....लहानपणी आजी सांगायची आपली नाळ जोडली असते गं आपल्या गावाशी.... तेव्हा काही कळायचं नाही... वाटायचं असं कसं मलातर आजीच्या गावी यायची किती घाई असते..कधी एकदा सुट्ट्या लागतात अन् मी आजोळी जाते असं व्हायचं.. मग माझी नाळ आजीच्या गावाशी जुळायला हवी नं.. पण सुट्या संपताना मनाला लागलेली घराची ओढ तेव्हा लक्षातच आली नाही... खरं सांगायचं तर तशी सगळीच शहरं सारखी.. पण प्रत्येकाच्या मनात स्वतःच्या गावाचं एक खास स्थान..निमित्त काहीही असो.. पण गाव सोडताना मनाची अशी काही कालवाकालव होते नं..मनावर प्रचंड दडपण... एक भिती.. असुरक्षितता.. उभं जग जणु खायला उठलयं..
तसं तर आजवर मला भेटलेल्या प्रत्येक गावानं मला आपलसं केलयं.. मला रमवलयं...नंदुरबारने माझं बालपण जपलं, नागपुरने मला माझ्या पायावर उभं केलं, अन् पुण्याने पोट्यापाण्याला लावलं... खरचं खुप दिलयं ह्या शहरांनी आजवर... पण तरिही जन्मगावाची ओढ तशीच... अन् गाव सोडतानाची दरवेळीची रितेपणाची जाणिवही सवयीची.. तरीही नवी..

No comments:
Post a Comment