Sunday, December 15, 2013

..

एक पल की जिंदगी और एकही पल की तो मौत, पता नही इस दौरान लोग जीना कब सिखते है

कौतुकाची शिसारी आलीय का रे तुला कधी? नाही म्हणजे तू केलेलं काम, तुझा आत्मविश्वास, तू लहान वयात यशस्वीपणे पेललेल्या सगळ्या जबाबदार्या.. सगळंच अगदी सगळंच काबिले तारीफ..खरच.. पण.. पण ह्या कौतुकाच्या लाखो क्षणात एक क्षण तरी हेच कौतुक बोचलंच नाही तुला असं नाही नं? कसंय नं वरवर दिसतं ते त्याग,समर्पण, अभ्यास, आणि बरंच काही... पण दिसत नाहीत अचानक आलेल्या जबाबदारीने कायमचे झुकून गेलेले खांदे... घरच्यांचा धीर खचू नये म्हणून एकट्याने रडून घालवलेल्या रात्री... समोरच्या आव्हानांनी दडपून डोळ्यात चमकून गेलेली भीती... कोणी पाहिली? नाही न? मग नाहीच त्यांना अधिकार कौतुक करायचा... ध्येय..करिअर.. सगळं बोलायच्या गोष्टी राव... आणि हो मला माहितेय कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है.. पण काहीही ठरवलं नसताना हातून एका क्षणात अनेक वर्षं ओढुन नेली जातात नं तेव्हा, इवल्याश्या वयातल्या एवढ्या समुजुतदार मनाच्या अखंड कौतुकाची शिसारी येतेच.. तुलापण हो नं?

Ganesh Bagal गणोबाच्या पोस्ट्वरुन डोक्यात हेच काय ते भरभर येत गेलं.. पटेलच असं नाही.. तरी.

लोक एकाचवेळी काय काय करत असतात नं .... काम , छंद, कर्तव्य, आवड.. मस्त सांगड घालत असतात.... आणि आपलं मात्र तेच ते रडगाणं.. वेळ मिळत नाही.... दिवसाचे २४ तास सगळ्यांचे सारखेच नं हो ... तरी रोज चिडचिड आणि ह्यांची हसरी संध्याकाळ... हेवा वाटतो मला सगळं काही मस्त म्यानेज करणाऱ्या ह्या लोकांचा.. श्या जमायला हवं यार हे... क्लासेस असतात का हो ह्याचे कुठे.... हो आणि कौतुकहि वाटतं हं सगळं करून ह्यात काय मोठसं म्हणणार्या ह्या जनतेचं...

टीपकागद हो... बटर पेपर नाही.... भलं बुरं...काहीही.. अगदी काहीही...कशाचाच काही वाटत नाही असं खरच नसतं गं? अगं तुझं अनुभवणं जर थांबलं नाही , तर जगणं तरी कसं थांबेल.. नाही का?

नात्यांमध्ये किती गुरफटून जातो नं आपण..इतकं की त्यापलीकडे त्या व्यक्तीचं माणुस असणं नकळतपणे विसरत जातो..रादर गृहीत धरत जातो..नाही का? खासकरून आई बाबांबद्दल... नेहमीच... हो नं?

No comments:

Post a Comment