त्या कळण्या न कळण्याच्या सीमारेषेवरच्या तुझ्या असंख्य प्रश्नांपैकी ,नेमका तो प्रश्न मात्र अनुत्तरीतच ....अजूनही....ठाऊक असलेल्या सगळ्याच उत्तरांना प्रश्न पडावेत असं तर नाही नं
.......................................................................................

..........................................................................................
शोध घ्यायचाच म्हटलं की मग हवं नको सारंच उकरलं जाणार बघ .....पुन्हा एकदा...ते टाळता नाहीच गं येणार बयो ....मागे वळून बघणं म्हणूनच तितकसं सोपं नसतं नं....असंख्य वाटा दिसतात गं असं पाठमोरं वळताना...काही वाटांवर अर्थातच असतात आपल्या पायांचे ठसे...पण...काही जाणून बुजून टाळलेल्या कोर्या वाटा आजही असतातच गं तिथे.. त्यांचं खुणावणं असं दुर्लक्षणं जमणार आहे का तुला ? भुतकाळातल्या संदर्भांचा शोध जरुर घे...तुझ्या आजच्या असण्याचं स्पष्टीकरण नक्कीच आहे त्यात...पण जितकं खोल खोल जाशील तितकी तिथेच रुजत जाशील ह्याचं भान मात्र असू दे...
............................................................................................
मळभ ओसरल्यानंतरच्या निरभ्र आभाळातून झिरपत जातो एक एक किरण... लख्ख बोचरा..तरी हवाहवासा... किरण
अचानक असं समोरं आलो की आपलंही असंच होतं नं रे ... सुरवातीची सर ओसरली की लख्ख होत जातात बोथटलेले नाजूक सल...एकमेकांना असं टाळणं नाहीच का रे जमणार कधी ?
...............................................................................................
कसं असतं नं कळायचंच म्हटलं नं की समोरचा माणूस एका मिनिटात कळतो रे .... नाहीतर अख्ख्या आयुष्यभर डोळ्यांना झापडं लावून तपासात बसतोच नं निरनिराळ्या भूतांची निरिक्षणं.. त्याच माणसाबद्दलची ..
................................................................................................
एखादं ध्येय.. उद्दिष्ट ठरवतो आपण... सुरु करतो ते गाठायचे प्रयत्न.. अगदी मनापासून प्रयत्न करत जातो अन रिझल्ट्सही मिळत जातात.. टप्प्याटप्प्याने का होईना पण आपलं ध्येय जवळ आलाय अस वाटायला लागतं... नेमकं ह्या वेळी आपल्या प्रयत्नात शिथिलता यायला लागते.. कंटाळा यायला लागतो त्याच त्या रुटीनचा... अन असं करता करता एक दिवस आपलं आपल्यालाच लक्षात येतं की अरेच्चा आपण पुन्हा एक पाऊल मागे आलोत कि... जे गाठायचं होतं ते जरा दूर भासायला लागलंय हे कळतं... हा.. नेमका हा क्षण आवडतो मला... रीअलाझेशनचा... घडून गेलेल्यांच्या त्यामागे न पडता पुन्हा पुढे जाण्याचा...मागे गेलेलं एक पाऊल पुन्हा रिदम मध्ये आणत पुढे जाण्याचा... हो हाच क्षण मनापासून आवडतो मला..पुन्हा पुन्हा चुकण्याचा अन त्या सुधारण्याचा क्षण...
..................................................................................................