अगदी क्वचित...आपल्या अपेक्षेपेक्षा नेमकी विरुध्द प्रतिक्रिया समोरच्याकडून आली कि लगेच त्याला आपल्याला हवं ते लेबलं लावायची किती घाई करतो नं आपण? आणि एकदा का ते लेबलं डकवलं कि चाचपून बघण्याची तसदीही न घेता टाळत जातो समोरच्याला तो ते लेबलं अगदी सार्थ ठरवेपर्यंत...हो नं?
..................................................................................................................................................................................................................
परिघावरचेच असतो रे आपण कायम.. ठाऊकही असतं आपल्याला ते नेहमीच..तरी केंद्राची ओढ काही शमत नाही..ध्येय बदलत जातात ध्यास मात्र पाठ सोडत नाही..गोल गोल फिरत परिक्रमा पुर्ण करत बसतो बस्स..गम्मतच आहे नाही का?
..............................................................................................................................................................................................................
मुसळधार पावसानंतरचं थेंब थेंब निथळणारं घनदाट रान.. गर्द हिरवंगार.. पानापानावर साचलेलं पावसाचं पाणी नजाकतीनं सावरणारं....चूकार चारदोन किरणांना कवडश्यांत खेळवणारं...ओलंचिंब रान .. अश्या ह्या रानातलं एक साधंसं गाव.. जगाशी जोडलेलं तरी आडवाटेवर विसावलेलं.. मोजक्या कौलारु घरांचं .. मातकटलेल्या रस्त्यांचं.. चार पावलांच्या अंगणांचं ... लहानश्या दगडी वृंदावनाचं ... ह्याच गावातलं उतरत्या सांजेच्या पावसाला अनुभवणारं एक घर...कोणाच्यातरी मालकीचं तरी आपल्या हक्काचं.. संधिप्रकाशात न्हालेलं... दूरवरुन येणार्या ग्रामदेवतेच्या मंदिरातल्या घंटानादात तल्लीन झालेलं.. आपल्यातच रमलेलं एक घर..
Dream destination..... ह्यापेक्षा जास्त काही नको
.........................................................................................................................................................................................................................
कई साल पहले किसी अपने ने पुछा था हमे "याद भी है ,कब देखा था आखरी बार आईनेमें अपने आप को रोते हुए? ", बस तभीसे इन होठोंकी मुस्कान आजभी बरकरार है..
..........................................................................................................................................................................................................................
"खूप खूप वर्षांनी आपल्या गावी गेलो कि काय काय ढुंडाळत असते रे नजर... कित्येक वर्षांपूर्वी जपून ठेवलेलं काहीच कसं रे हाताशी लागत नाही... तेच रस्ते, तेच कट्टे, अन त्याच वळणावळणाशी खुणेसाठी पेरलेल्या आठवणी... तरी ओळखीच्या प्रत्येक वळणावरचं अनोळखीपण नव्याने उमललेलं परकेपण सुचवत असतं का रे आपल्याला ? फक्त काही वर्षात..(कि खूप रे?) इतकं कसं रे बदलू शकतं कोणी?"-
"वेशीचं पोरकेपण जपणं उरतं गं फक्त आपल्या हातात..तेच काय ते आपलं.."

पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?

नातं म्हणजे नेमकं काय रे? वर्षानुवर्ष एकमेकांसोबत राहणं म्हणजे नातं की आपल्या दोघांत मागच्या कुठल्यातरी एका पिढीतली गुणसुत्र बागडताहेत म्हणून आपलं नातं? नाही नं ..मला काय वाटतं माहीतेय, ऐन गर्दीच्या मध्यात विनाकारण आपण हरवलोय असं सतत वाटत असताना ..आपल्या तिथे असण्याचं नेमक्या कारणांची जाणीव म्हणजे नातं..एखाद्या गोष्टीवर,वस्तूवर ,आणि माणसावर असलेल्या हक्काची जाणीव (जबरजस्ती नाही ) म्हणजे नातं... हो नं?
........................................................................................................................................................................................................................
कधीचे फक्त चाचपडतोय रे एकमेकांना...नेमका शोध कशाचा हेही ठाऊक नसताना नुसता वेध घेतोय... इतके कसे रे गूढ झालोत परस्परांसाठी की किर्र अंधाराची चादर कधी विणली गेली दोघात हेही कळू नये? दिसेनासं झालो नं की कळतं, काही कोडी ही अशी का तयार होतात ते ...चाचपडतच का होइना पण अडकत जातो रे त्या कोड्यात...कधीच न सुटण्यासाठी प्रयत्न करत..आजन्म

माझ्यातल्या 'मी'ला अंतर्बाह्य बदलून टाकणारी एखादीच घटना घडून गेल्यावर... 'मी' उरते का? माझ्यातल्या 'मी'पणाचा नवा जन्म म्हणजे जून्या माझा मृत्यू होतो का ? मग नेमकी मी कोण? घटनेपुर्वीची की त्यानंतरची..दोघी एकमेकांना अनोळखी की एकाच नाण्याच्या दोन बाजू?
दृष्टीच्या शोधात असणारी successful पण आंधळी Photographer खरी की दृष्टी मिळाल्यावरा हरखलेली पण तरी अस्वस्थ ती खरी ... तत्वासाठी झगडणारा मरणाच्या दारात असूनही doctor नाकारणारा साधूबाबा खरा की एका उत्कट क्षणी स्वतःहून doctorना शरण जाणारा तोच साधू खरा...
एखादी घटना आयुष्य बदलवते.. पण आपण बदलतो अमुलाग्र?
.......................................................................................................................................................................................................................
अख्ख्या जगाला जे सहज विनासायास मिळतं ते आणि नेमकं तेव्हढंच मिळवण्यासाठी आपलं सततचं झगडणं म्हणजेच जगणं असतं का रे?
..................................................................................................................................................

No comments:
Post a Comment