अधमरीसी आँखोंतले पनपते अनगिनत जिंदादिल ख्वाब,,.. कुछ तो अधुरा रह गया हैं शायद है ना?
................................
ओळखीच्या पुढे पण नात्याच्या अल्याड घुटमळलेल्या एका नव्या वळणावरचे जुनेच आपण …. तसं तर मागे वळून पुन्हा ते अनोळखीपणा ही नकोय अन पुढे सरसावायचा धीर येईल इतका विश्वासही नाही अजून आपल्यात हो नं ….असं कसं हे विचित्र अवघडलेपण वागवत रोज नव्याने सामोरं जातोय नं आपण…. तरी हे वळण सरावं असं मात्र वाटत नाहीये ….एक मैलाचा दगड असावं असं वाटतंय हे वळण… यदाकदाचित पुढे नातं गुंफलं गेलंच नं तर पुन्हा कधीतरी मागे वळून बघताना हाताशी येणार्या काही खास क्षणांना जपून ठेवणारं हे हळवं वळण… विसावू का रे इथे… क्षणभर
.................................................
प्रवास म्हटलं की सोबत आलीच...अन् सोबत म्हटली की गुंतणं आलं..मग ह्या गुंत्याला नात्याचं नाव आलं..नातं म्हटलं की अपेक्षा आल्या..अपेक्षाभंग आला.. तुटणं आलं.. सगळा
प्रवास एकट्यानेच केला तर नाही का रे चालणार?
....................................................................
अंधार चाचपडायला लावतो अन् प्रकाश समोर उभं करतो हे "मी"पणाचे कोंदण
......................................................
स्वप्नांचं नं एक वय असतं.. कधी काही क्षणांचं तर कधी काही जन्मांचं सुद्धा.. तुला माहीतेय काही स्वप्न तर अगदी गर्भातच जीव सोडतात.. पण म्हणून स्वप्नं बघायचीच नाहीत असं तर नाही नं ?
.....................................................