किती किती ठिकाणी उसवलेलो असतो रे आपण, एकही जागा एकसंध नाही... निमित्ताला कधी एक साधा ओरखडा तर कधी एखादाच पण जीवाघेणा वार...उसवून जातो खोलवरचं सारं काही.. घट्ट आवळून जपलेलं..आपल्याही नकळत मग पाझरत जातो आपण त्या लहानमोठ्या उसवणीतून.. रिते होत जातो..कोणाला कळेल न कळेल ह्या बेताने... पण कळतंच काहींना..हे उसवणं ..पाझरणं..सावरणं.. अन् सुरु होतो अट्टाहास ह्या उसवणी झाकण्याचा ..त्याच बेढब ठिगळांनी वरवर सारं सांधायचा.. जमेल का रे?
की पुन्हा एक नवा जन्म नवा सोहळा.. उसवण्याचा.. पाझरण्याचा.. सावरण्याचा....
.......................
दोन तीरांवर दोघे आपण... तरी रोज भेटतो रे .. नाही स्वप्न वैगरे नसतं ते..तू असण्याची खात्री असते..तासंतास बोलूनही तुझ्यावर न लादलं जाण्याची..रिती होत जाते रे रोज नव्याने.. पुन्हा पुन्हा भरुन येण्यासाठी..तुला जाणवत असतं रे न सांगितलेलंही.. न घडलेलंही..आपल्या नात्याला नाव नको म्हणायचे ते याचसाठी.. निरागसता कुठल्या रे नात्यात गुंफायची.. असेच राहूया का अनामिक
.......................................
जरा निवांत झालो की एकेक बोच कशी लख्ख होत जाते...उजळून निघते... अगदी जुन्या पुराण्या संदर्भासहीत... मग आपल्याही नकळत देत जातं मन स्पष्टीकरण ,त्या प्रत्येक घावाला गोंजारण्याचं ... त्याला कुरवाळण्याचं... त्रास तर तेव्हाही होतच असतो नं , हव्याहव्याश्या संदर्भात नको ते गुंफलं जात असताना...उघडा होत असतो एकेक सल आठवणींना लगडलेला... कधी सुखावणारा,.. तर कधी....जीवघेणा...गुंतलो होतो एकमेकात तेव्हा नव्हतं का रे असं काही,..सुटी झाले अन् रिती झाले बघ अशी
..............................................
सांज, संध्याकाळ, मावळण काहीही म्हटलं तरी फारसा फरक काही पडत नाही.... उरात अनामिक हुरहुर अन् डोळ्यात खळ्ळकन पाणी हे नातं आजही बदलत नाही .... गर्भार रात्र अजूनही तशीच वांझोटी स्वप्न ओटीत रुजवून वेशीवर अवघडलेली अन् दिवसाची काही देणी आजही न फेडता आलेली....ह्या दोन्हींमधली ही मावळण टाळायला सांग नेमकं कोणाचं असणं लांबवू?
...............................................
कधीतरी अशीच गर्दीतुन चालता चालता त्याच्याशी टक्कर झाली..ओशाळं हसू देउन पावलांची नजरानजर झाली...लक्षात राहण्यासारखा चेहरा नव्हता तसा पण हो दिलखुलास हसू होतं त्याच्याकडे..ते तेव्हढं अचूक लक्षात राहीलं..त्याने जोडलेल्या प्रत्येक नात्याचा TRP असलेलं हे मनमोकळं हास्य..खरतरं तिथेच जिंकलं होतं त्याने..मैत्री व्हायला ओळख वैगरे सोपस्कार त्याच्यासाठी नव्हतेच कधी.. योगायोगाने नव्हे तर ठरवून भेटत राहीला तो..क्वचितच कारणाने.. निखळ गप्पा हेच काय ते कारण... एक दिवस तुझ्यासोबत तो आला.. तुझा मित्र म्हणून ओळख झाली..अन् माझी मैत्रीण म्हणून..सुरवातीच्या अवघडालेपणातून दोघंही गप्पच.. तू मात्र आखंड वाहता.. आम्हाला ओढलंसंच.. बघता बघता आमच्यातही जन्माला आलंच नातं.. अन् गूंतत गेलो त्यातच.. इतकं की तूझं आलगद आमच्यातून बाजूला जाणं जाणवलंही नाही.. नाही तू होतासच आजूबाजूला..नवी नाती विणत..तरी कळण्याइतपत अंतरावर... का हे असं हा प्रश्न मात्र तेव्हा पडलाच नाही.. आजतरी पडतोय का माहीत नाही...हो पण काल पुन्हा जोरदार अडखळले कोणालातरी अन् कानावर ओळखीचं काहीतरी आलं म्हणून हरखले इतकंच
....................................................................
.

तुला एक सांगू का? बघ हं हसशील नाहीतर ... तू बोलत असतोस नं काहीबाही... महत्वाचं.. बिनमहत्वाचं ..अगदी काहीही.. पण बोलत असतोस नं, तेंव्हाच सुचत असतं बघ मलाही काहीतरी.. सांगण्यासारखं ... न सांगण्यासरखं... अगदी काठोकाठ शिगेवर असतं मन... रितेपणाच्या ओढीत ... पण तरी तुला मात्र थांबवावंसं नाही रे वाटत...तुझा ओघ नाहीच तोडवत...अन नेमकं कसं काय कोण जाणे, 'मी' कळून तू अचानक गप्प होतोस.. अन म्हणतोस... "बोल, ऐकतोय मी.."
आपल्या नात्याला ह्यापेक्षा वेगळं कसं रे मांडायचं... तू म्हणतोस त्याला pure white पण मला मात्र रंगांचे थवे दिसतात त्यात... हरखायला होतं तिथे मला... हरवायला होतं.. कारण खात्री असते तू हरवू देणार नाही ह्याची... मनसोक्त बागडावसं वाटतं.. नाचावंसं वाटतं...गुणगुणावंसं वाटतं.. कशाचीही तमा न बाळगता जगावसं वाटतं... कारण दिल्या घेतल्या श्वासांचा हिशोब आपल्यात कधीच नाही.. तू व्हर्जिन म्हणालास नं ह्या नात्याला... ते असं समजलं मला... एका अदृश्य अंतरावरून झोकून देतोय दोघाही सर्वस्व ह्या नात्यात.. अंतरं असली तरी सुरक्षिततेची गरज नसलेलं ... आपसूक जपलेलं... तरी एकमेकांना सावरू शकू ह्या विश्वासाचं... नात्याचं पावित्र्य ह्या विश्वासावरच ठरतं नं रे... |
No comments:
Post a Comment