अधिकार...किंवा सोप्प्या शब्दात ताबा म्हणूयात हवं तर... तो असायला हवं खरंतर..कशावर? मनावर?त्याच्या भरकटण्यावर ,त्याच्या react होण्यावर..अन् त्याच्या असण्यावर...कारण हाच ताबा सुटणं नेहमी अडचणीत आणतं हो नं.. मला माहीतेय तु म्हणशील इतकं का ते सोप्पं आहे? पण वेड्या म्हणूनच तुला जमतंय तितकं जप म्हणतेय..नाहीतर तुझी सोबत आहेच नं.. तोल सुटलेल्या किंवा भरकटलेल्या तुला सावरायला,तुझं तुपण तुझ्या ओंजळीत द्यायला... सोबत त्यासाठीच हवी असते हो नं...
...........................................................................
...........................................................................
गुंता जुनाच रे ...अन् ठरल्यासारखं त्याचं स्थिर टोक तुझ्याच हातात..पण मी खुळ्यासारखी खेळत बसते त्या गुंत्याशी..अन् स्वतःच अडकते त्यात...तुझ्यासाठीच सोडवायचं असतं सगळं आणि तरी गुंतवायचं असतं तुला त्यात.. पण बघ नं नाहीच जमलं ते कधी..तु मात्र नेहमीच ह्या गुंत्याबाहेर..खळाळत्या झर्यासारखा..निखळ.. नितळ..प्रवाही..मग तुझा गुंता कसा होणार..काही गोष्टी कधी कळल्याच नाही नं रे मला....
.............................................................................
आठवणीत असं ठरवून नाहीच रे डोकावता येत..ठरवून आठवलं की त्याचा तपशील होतो
...............................................................................
खोल खोल तळाशी पक्क ठाउक असतं आपल्याला आपण कोण ते...आपल्या जगण्याचे नियम तिथे आपणच असतात कोरलेले..अन् इमानेइतबारे आपण ते पाळतही असतो..अगदी न चुकता..पण कुठल्यातरी एका वळणावर ह्या खोल तळाशी लक्कन काहीतरी हलतं..एक झुळूक होऊन कोणीतरी त्या तळाचा ताबा घेतं..आपल्याही नकळत..आपलेच नियम आपल्यापुरतं मग बदलत जातात..त्या झूळकेचा ताल श्वासांची लय ठरवतं..काळजाच्या ठोक्यावरही जाणवतं मग त्याचं अधिराज्य..सवयीची होत जाते ती एक एक खोलवरची जखम अन् त्यावरचा उताराही ...भिनत असतं कोणीतरी रंध्रारंध्रात..हवीहवीशी नशा जणू..ह्या धुंदीवर स्वार होउन मध्यावर येता येता मात्र काचत जातं सगळं..हव्याहव्याश्या उसास्यांचं ठेचाळणं, गुदमरणं..ठरवून टाळलं जातं मग सारं...हवसं..नकोसं..सारंच...तेव्हा कुठे हरवलेल्या त्या मीपणाची जाणीव अचानक लख्ख होत जाते..तळ गाठायची..कोष जपायची घाई होते..अन् खोडलेल्या जून्या नियमांचा खडबड्या स्पर्शावर अलगद नवे मीपण कोरले जाते.
................................................................................
लपाछपीचा खेळ तर सूरुच आहे अव्याहतपणे.. अजूनही..फक्त डाव कोणावर अन् लपतोय कोण कोणापासून हेच कळत नाहीये..की एकच आहेत रे दोघंही..नियतीकडे पाठ करुन आपल्याच नादात म्हणतोय आपण १०,२०,३०...१००..येउ का?आपल्यातच लपलेल्या मीपणाला शोधायला...अन् एका गाफील क्षणाला नियती म्हणते ये..अन् निघतो आपण शोध तसाच अर्धवट टाकून...डाव पुढच्या जन्मावर ढकलून..
...........................................................................
कितनी बार कहा हैं ऐसी बारिश में अपने सारे ख्वाब संभाल के रखा करो...किसी ऐसी जगह जहाँ वो उन्हें छू न सके...बड़ी मिन्नतों के बाद धूप ने चुना था इन्हें..बताया तो था न तुम्हें...अब भला तुम ही बताओं कौन खरीदेंगा ऐसे गिले ख्वाब...सड ही जाएगें न... हरसाल की तरहा... नई फसलों के नये ख्वाब...
.............................................................................
पावासानं कसं समुद्रावर कोसळावं..उंचच उंच डोंगरावर पडावं..दर्या खोर्यात रमावं..पण हे असं ओसाड माळरानावर? ...माळरानावरचा पाऊस अनुभवलायस का रे कधी? नजर जाईल तिथवरच्या आभाळाचं काळंपण भिनंत जाणं.. प्रत्येक सरीचं ते असोशीने कोसळणं अन् तितक्याच निकराने काळ्या कातळाने ते नाकारणं..नाही म्हणायला ४-२ चुकार थेंब झिरपतही असतील कातळाच्या रंध्रारंध्रात अन् होतही असेल जन्म आशेचा.. मृत्यू निश्चित करुन..पण हरेक कोसळत्या थेंबाचा हिशोब जेव्हा तो परतवायला लागतो नं तेव्हा पाऊसही पाणावत असेल का रे?
.........................................................................
अर्धवट असतं सगळं.. रेघोट्यांच्या नात्यांसारखं..धड गुंतताही येत नाही अन् अलगद पाय काढताही येत नाही..हवं तर असतं त्यातलं सगळंच.. प्रेम..ओढ..पण नकोसं असतं ते हवं तेव्हा हवं तिथे तत्पर असणं..
नात्याला expiry date असायला हवीशी वाटते ती ह्यासाठीच रे... निदान नातं विषारी होतं कधीहे तरी कळेल.. अन् कदाचित तसं होण्याआधी तरी गुंता सोडवायचा प्रयत्न करु..घुसमटलेला गळफास तेव्हा तरी सुटेल
नात्याला expiry date असायला हवीशी वाटते ती ह्यासाठीच रे... निदान नातं विषारी होतं कधीहे तरी कळेल.. अन् कदाचित तसं होण्याआधी तरी गुंता सोडवायचा प्रयत्न करु..घुसमटलेला गळफास तेव्हा तरी सुटेल
......................................................................................
हातचा घ्यायचा म्हणून बाजूला ठेवलेली नाती हिशोबातून सुटलीच तर रे काय करायचं... उत्तरांची टाळाटाळ... कि प्रश्नांचा फेरविचार...
......................................................................................
पावसाळी रंगाचं भरगच्च आभाळ त्याचा हक्काचा पाउस मिरवत असतं..वरवर सारं शांत शांत...एकसंध... तरी आतून सगळंच हललेलं असतं..अगदी कुठल्याही क्षणी तुटेल आता इतकी कवाडं तटतटलेली....पण आभाळ मात्र तटस्थ..थिजलेलं.. जागच्या जागी..
किती वेळ..किती काळ..कोणास ठाउक...विरतही नाही अन् मोकळंही होत नाही हे मळभ...
पावसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा ठाव घेत राहीलं की हे असं होतं ... नजर लागून पाऊस मग जागीच मिटत जातो
किती वेळ..किती काळ..कोणास ठाउक...विरतही नाही अन् मोकळंही होत नाही हे मळभ...
पावसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा ठाव घेत राहीलं की हे असं होतं ... नजर लागून पाऊस मग जागीच मिटत जातो
No comments:
Post a Comment