तुझ्यातलं वेगळेपण तुला स्वतःलाच शोधायला हवंय नं ....कोणी सांगून किंवा दाखवून वेगळेपण नाही रे सिद्ध करता येत... फार फारतर गर्दीतनं बाजूला काढतील लोकं तुला,पण त्याने वेगळेपण नाही तर फक्त एकटेपण सिद्ध होतं,हे का ठाउक नाही तुला? म्हणून सांगतेय घे शोध स्वतःचा.... निदान तुझं तुला तरी उमगु दे तू आहेस तरी कोण ते....एकदा का हे कळलं नं की बघ भर गर्दीतही दिसतील तुला असे असंख्य अवलिये... तुझ्यासारखे... वेगळेपण जपणारे....
............................... .........
समांतर रस्त्यांवर चालताना एकमेकांना टाळता येत नाहीच रे तसंही.... मग तरीसुद्धा एकाच मार्गाने एकत्र चालण्याचा हा तुझा अट्टाहास नेमका कशासाठी रे ? पायवाटांचे शाप का तुला माहीत नाही? एकत्र नाही एकापाठोपाठ असावं लागतं रे तिथे, कोणीतरी एक सतत मागे राहणारच...उरलं सुरलं सावरत... नेमकं हेच नकोय रे मला.फरफटत तुझा पाठलाग करणं ...आयुष्यभर अन् तसंही दिसत राहूच रे आपण एकमेकांना.कायम.अगदी नकोनकोसे होईपर्यंत भेटणं मात्र टाळूयात का रे दोन समांतर रेषांचा प्रवास सारखा असला तरी शेवट एक नसतो नं तसंच आहे आपलं असं समज हवं तर
.............
ध्यानीमनी नसताना अचानक समोर उभा ठाकलेल्या एखाद्या अलवार ओल्या क्षणासारखा होतास तू भिरभिरत्या नजरेने थेट काळजाचा ठाव घेणारा खोल खोल उतरत तळ ढवळणारा अन् काही कळायच्या आत सावरायचाही अवकाश न देता अलगद निसटून गेलेला कधीही परतून न येण्यासाठी
.......................
Friday, April 25, 2014
Suchel te
Thursday, March 27, 2014
विचार
घट्ट आवळल्या मुठीतून निसटत असतं रे जगणं... सतत ....अगदी कणाकणाने ....बघणार्यांना वाटत असतं की कसला हा मुर्खपणा? का हा अट्टाहास? काय दडवलयं असं ह्या मुठीत? सरळ उघडायची मुठ...धरायची ओंजळ...अन् साठवायचं शक्य तितकं ....पण ..तुला सांगू ... कितीही आव आणला नं तरी ज्याची त्याला बरोबर जाणवते घट्ट मिटलेली रिकामी मुठ अन् त्याच मुठीची ओंजळ करण्यातला फोलपणासुद्धा...सगळ्याच गोष्टींचं दान असं ओंजळीत नाही नं रे घेता येत
अनंत पळांची ही आवर्तनं अशीच सुरु राहणार रे .... ती का कुणास चुकलीय...... जे इतक्या निकराने टाळतोय ते परतून येणारच.... आवर्तनांची ही वर्तुळं एकातएक गुंतत गेली नं की मध्य गाठता येतो म्हणे ....तोवर मात्र धीर धरता यायला हवा....
खरंतर निस्वार्थी वगैरे नसतं रे कोणी.... किमान एका समाधानी क्षणाचा स्वार्थ तर असतोच नं दोन्ही पारड्यात...
नातं म्हणजे तुझ्या माझ्यात वाटून घेतलेले असंख्य क्षणच नं...मग ते शाश्वत असण्याचा अट्टाहास का ?..आत्ता ह्या घडीला तुझ्या माझ्यातून नकळत निसटून जाणार्या क्षणाशी नाही का नातं जोडता येणार....
एक अंत और एक शुरूवात के बिचोबीच...कभी बहती राहोंकी खामोशी ताकते....तो कभी बंद तालोंका शोर सुनती....एक शाम आजभी वही दरवाजेपे खडी है... सही वक्त के इंतजार मे..
नुकताच हातून निसटलेला व्यस्ततेचा एक तुकडा... अन् अवघ्या काळावर स्वस्थतेचं गारुड... शांत निवांत एकांत पुन्हा एकदा....अवघडलेला... अविरत अस्वस्थ व्यस्ततेची ओढ लावणारा....
Tuesday, February 18, 2014
तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या एखाद्या पझल सारखे असतो रे आपण.... सगळेच....आयुष्यभर वणवणत असतो त्या एका हरवलेल्या तुकड्याच्या शोधात पुर्णत्वाच्या शोधात ...आणि गंमत माहीतेय आपलं पझल नं आपल्याला कधीच नसतं उमगलेलं ..... तरी दरवेळी एक नवीन permutation combination करत आजमावत असतो आपण आपल्यालाच.....निरखत असतो दरवेळी एक नवीन मुखवटा.....ओळख नाकारणारा....हरवलेला तो एक तुकडा आणि त्या भेसूर मुखवट्याचं गणित खरं तर ठाऊक असतं ज्याचं त्याला... ठाऊक नसतो तो तुकड्या तुकड्यातून एकसंध ओळख घडवणारा प्रवास बरोबर नं ?
नुकताच हातून निसटलेला व्यस्ततेचा एक तुकडा... अन् अवघ्या काळावर स्वस्थतेचं गारुड... शांत निवांत एकांत पुन्हा एकदा....अवघडलेला... अविरत अस्वस्थ व्यस्ततेची ओढ लावणारा....
एकीकडे हळूहळू रात्र चढत जाताना , एकेक पायरी उतरत पेंगुळलेल दुधाळ चांदण अलगद स्वप्नांच्या कुशीत कधी निजत कळतही नाही.. हो नं?
हररोज मिलते थें उनसे ......हररोज बातें होती थी ......मुलाकात होते होते बस बरसों बीत गये
स्वत:चा स्वत:शी संवाद कधी तुटू देउ नये बयो... कोण जाणे बर्याच वर्षांनंतर.. पुलाखालून जेव्हा बरंच पाणी वाहून गेलं असेल..निसटून गेलं असेल जेव्हा बरचंस..कधी शब्द कधी मौन... कधी स्वप्न कधी सूर... तेव्हा...तेव्हा असायला हवं किमान एकजण तुला ओळखणारं... बाकी जगाच्या अनोळखी नजरा सहायला सोबत होते बस्स.. बाकी काही नाही
Sunday, December 15, 2013
..
एक पल की जिंदगी और एकही पल की तो मौत, पता नही इस दौरान लोग जीना कब सिखते है
कौतुकाची शिसारी आलीय का रे तुला कधी? नाही म्हणजे तू केलेलं काम, तुझा आत्मविश्वास, तू लहान वयात यशस्वीपणे पेललेल्या सगळ्या जबाबदार्या.. सगळंच अगदी सगळंच काबिले तारीफ..खरच.. पण.. पण ह्या कौतुकाच्या लाखो क्षणात एक क्षण तरी हेच कौतुक बोचलंच नाही तुला असं नाही नं? कसंय नं वरवर दिसतं ते त्याग,समर्पण, अभ्यास, आणि बरंच काही... पण दिसत नाहीत अचानक आलेल्या जबाबदारीने कायमचे झुकून गेलेले खांदे... घरच्यांचा धीर खचू नये म्हणून एकट्याने रडून घालवलेल्या रात्री... समोरच्या आव्हानांनी दडपून डोळ्यात चमकून गेलेली भीती... कोणी पाहिली? नाही न? मग नाहीच त्यांना अधिकार कौतुक करायचा... ध्येय..करिअर.. सगळं बोलायच्या गोष्टी राव... आणि हो मला माहितेय कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है.. पण काहीही ठरवलं नसताना हातून एका क्षणात अनेक वर्षं ओढुन नेली जातात नं तेव्हा, इवल्याश्या वयातल्या एवढ्या समुजुतदार मनाच्या अखंड कौतुकाची शिसारी येतेच.. तुलापण हो नं?
Ganesh Bagal गणोबाच्या पोस्ट्वरुन डोक्यात हेच काय ते भरभर येत गेलं.. पटेलच असं नाही.. तरी.
Ganesh Bagal गणोबाच्या पोस्ट्वरुन डोक्यात हेच काय ते भरभर येत गेलं.. पटेलच असं नाही.. तरी.
लोक एकाचवेळी काय काय करत असतात नं .... काम , छंद, कर्तव्य, आवड.. मस्त सांगड घालत असतात.... आणि आपलं मात्र तेच ते रडगाणं.. वेळ मिळत नाही.... दिवसाचे २४ तास सगळ्यांचे सारखेच नं हो ... तरी रोज चिडचिड आणि ह्यांची हसरी संध्याकाळ... हेवा वाटतो मला सगळं काही मस्त म्यानेज करणाऱ्या ह्या लोकांचा.. श्या जमायला हवं यार हे... क्लासेस असतात का हो ह्याचे कुठे.... हो आणि कौतुकहि वाटतं हं सगळं करून ह्यात काय मोठसं म्हणणार्या ह्या जनतेचं...
टीपकागद हो... बटर पेपर नाही.... भलं बुरं...काहीही.. अगदी काहीही...कशाचाच काही वाटत नाही असं खरच नसतं गं? अगं तुझं अनुभवणं जर थांबलं नाही , तर जगणं तरी कसं थांबेल.. नाही का?
नात्यांमध्ये किती गुरफटून जातो नं आपण..इतकं की त्यापलीकडे त्या व्यक्तीचं माणुस असणं नकळतपणे विसरत जातो..रादर गृहीत धरत जातो..नाही का? खासकरून आई बाबांबद्दल... नेहमीच... हो नं?
Wednesday, November 6, 2013
ए तू कधी ऋतुबदल अनुभवलंय?..रिमझिमणार्या पहाटेची सवय होतेय न होतेय तोच एका पहाटे अचानक हा पाउस जाऊन हलक्याश्या धुक्याने होणारं स्वागत अनुभवलंय? गणपती-नवरात्रीच्या धामधुमीत दमलेलं अन पहाटेच्या गारव्यात शांत गाढ झोपलेलं शहर अनुभवलंय? नाही? मग अनुभव हे.. सगळेच बदल जीवघेणे नसतात रे....
Whts on ur mind? हम्म... रोज वाटतं रे ह्या मनाशी किमान एकदातरी संवाद साधावा..विचारावं त्याला की बाबारे हे जे काय मी करतेय ते तुला पटतयं नं... तर्काने घेतलेले निर्णय भावनेला मान्य नसतीलही कदाचित पण त्यात नेमकं काय खटकतंय हे तरी कळावं... पण... हम्म हा पण मध्ये येतोच भीतीचं वावटळ घेउन... अन् मग नाहीच होत धीर मनाची चाचपणी करायचा.....उत्तरं माहीत असलेले प्रश्न नेहमीच असे टाळायचे असतात हो नं?
कहते है भीड का एक चेहरा होता है...और अकेलेपन कि खामोशी... हम्म.. भीड में छुपा सन्नाटा भी कभी सून लिया करो यारो...शायद ये अकेलपन तब बोल पडे...
"ब्रूम ब्रूम"
"झु$$$$$म्म"
"बाबा अजून जोरात चालवा...ब्रूम ब्रूम"
"ये ये... मस्त बाबा.. बाबा आता त्या काकांना मागे टाका.. आपणच रेस जिंकणार"
बाबांच्या स्कूटरवर समोर उभी त्यांची चिमुरडी ...बाजारातल्या गच्च गर्दीत बाबांच्या स्कूटरला रेस लावायला सांगत होती .. त्यांना गाईड करत होती ... जेमतेम ९-१० वर्षांची लेक...अनुभवलंय हे कधी ? स्कूटरच्या पुढच्या चिंचोळ्या भागात आपला इवलासा फ्रोक सांभाळत ताठ उभं राहणं? एका हाताने ह्यांडल घट्ट पकडत दुसर्या हाताने डोळ्यावर येणारे केस सावरणं?दोन्ही बाजुंनी बाबांच्या आश्वासक हातांची साखळी आणि पाठीशी त्यांचं कवच असणं? ... थोडक्यात काय तर जगातली सगळ्यात सुखी, भाग्यवान, (अति)आत्मविश्वासू मुलगी होणं... अनुभवलंय?
कोणी नेमकं कुठे थांबायचं हे एकदा नक्की करायला हवं बयो आता...परतायचं आहेच म्हटल्यावर शेवटाची किमान भीती तरी जाइल गं... आणि निरर्थक तुडवल्या गेल्या वाटेचा कदाचित नवा अर्थही लागेल...सारा जर तरचा खेळ बघ.. पण तरीही थांबायला मात्र हवंय गं बयो आता... थांबायला हवंय
अजनबी?... तुम कहते हो तो बन जाते हैं..अजनबी.. वैसे भी अब जानने के लिये रहा ही क्या है... बस एक आखरी बात... जीन सवालों के गुंचे मे अपनी मासुमीयत समेटे बैठे हो क्या उसी सवालोंके साथ मेरे जवाब भी जोड दोगे?... अजनबी जो बन रहे हैं..कही ये सवाल जवाबोंकी लडी मे फिरसे दिल न अटक जायें..करोगे इतना? अपने लिये?
" घर काय फक्त तिचं आहे? नवरा असला तरी माझाही मुलगा आहे तो"
"अगं पण आपलं ठरलाय नं ह्यावेळी बाहेर पडायचं?"
"म्हणुन काय झालं? आणि रोज भटकतोच कि आपण निरर्थक..आज जरा कणकण होती म्हणूनच थांबले नं?"
"अगं पण तिची अडचण माहितेय नं तुला? क्लास असतो तिचा ह्या वेळात"
"अहो पण म्हणून आपण घराबाहेर का? जाऊ द्या तुम्ही तिचीच बाजू घेणार.. मी आता पुन्हा नाही जाणार त्या घरी.. आजच आपण आपल्या घरी जाऊ"
"कुठल्या घरी?कोणाच्या घरी जायचं गं? मुलाच्या ह्या फ्ल्याटसाठी गावाकडंचं घर विकलं विसरलीस?"सकाळी सकाळी बसस्टोपवर उभी असता कानावर पडलेला हा संवाद..तुटक तुटक ऐकू आलेला.. कारणं माहित नाही पण रोज ठराविक वेळी हे ५०-५५ वयाचं जोडपं न चुकता दिसतं इथे...------------------------------ ------------------------------ -----ऑफिसला जाताना रक्षक चौकात आज जाम गर्दी.. आधीच उशीर झालेला आणि त्यात हि गर्दी.. चिडचिड नुसती.... ट्राफिक मध्ये अडकल्यावर सहज नजर आजूबाजूला वळली.. आणि कुतुहल जागं झालं.. साधारण १८-३० वयोगटातल्या मुलांच्या झुंडिच झुंडी.. खरं सांगते इतकी पोरं एकावेळी कॉलेज नंतर बघितलीच नव्हती..गर्दीचं कारण शोधता कळालं कि पोलिस भरती ची काही परीक्षा आहे... ट्राफिकमध्ये टाईमपास करता करता लक्ष त्या मुलांकडे गेलं... कोण कुठून कुठून आलेलं कोण जाणे.. पाठीवर स्याक...आणि हातात एक फॉर्म.. १००-५०० जागांसाठी २०००-२५०० हजार अप्लिकेशन...------------------------------ ------------------------------ -----काय होतं ह्या डोळ्यात..काका काकुंच्या आणि ह्या हजारो मुलांच्या..अगतिकता.. परिस्थिती... स्वप्न... कि भविष्य... सगळचं अधांतरी...
काही नात्यांचे धागे असतात असेच सुटे सुटे .. एक बाजू मनात बांधलेली.. फार घट्ट नाही.. अन खूप वरवरची पण नाही... बस्स असणं महत्वाचं ठरतं काही नात्यांसाठी..... कधीतरी जुळून येण्याच्या अपेक्षेत आजही सुटीच राहिलेली काही अनामिक,समंजस नाती...
आज माझे बाबा रेटायर्ड होत आहेत... कमीतकमी ३० वर्षांची नोकरी करून.... इथे मला ३ वर्षात कंटाळा आलाय त्याच त्या कामाचा जागेचा... अन बाबांनी ३० वर्ष? कमाल आहे खरच.. सकाळी त्यांना विचारलं कसं वाटतय.. सुट्ल्यासारखं... आता खरी सुरुवात.. राहून गेलेलं सगळं करायची.... काय मस्त फ़िलिंग असेल नं ती.. but still yaar..30 yr job?
Tuesday, August 13, 2013
मासुमियत
बडा ही मासुम लगता था तुम्हारा चेहरा जब कोई अटपटेसे जवाबो के सवाल खो जाने से तुम रो पडते थे... तबसे आजतक ये डर लगा रहता है.... कही उन जवाबोंकी रेलगाडीमे तुम्हारी मासुमीयत न खो जाये...
हाक
अजुन किती काळ तिथल्या तिथेच घुटमळणार आहेस? स्वत: भोवती गोल गोल फिरत अजुन किती खोल खोल रुतायचयं तुला? हाकेच्या अंतरावर असतं रे सगळं पण हाक मारणं आपलं आपल्यालाच करावं लागतं... कधी,कुठे,कसं नाही ठाउक मला... आभाळाच्या पलिकडून तर कधी स्वत:च्याच गाभार्यातुन...पण प्रत्येक हाकेला ओ मिळतोच... बस एकबार आवाज लगाके तो देखो...