एखादा दिवसच मुळात असाच उगवतो .. खूप खूप राग आलेला असतो ... अगदी नाकाचा शेंडा लाल अन डोळ्यात चीड असा राग ...पार दुपारपर्यंत धुमसत असत मन .. अन उतरत्या सांजेला अचानक जाणवत नेमक का रागावलो आहोत आपण ? कोणावर चीडलोय ? क्षणार्धात कळून चुकतो तेंव्हा आपल्याच रागाव्ण्यातला फोलपणा... अन मग उतरत जाते रात्र पाणावलेल्या डोळ्यात... मुस्मुसणाऱ्या नाकात...
No comments:
Post a Comment