Sunday, January 6, 2013

'पर्वतांना' कोसळ्ताना पाहिलं आहेस कधी? नाही नं? पण तोल जातो रे कधीतरी त्यांचाही.. अन सामावतात ते 'दरीत'.... जितका 'पर्वत' उंच तितकीच ही 'दरी' खोल...तु कितीही नाकारलसं तरी तिचं अस्तित्व तुझ्याच भोवती विणलेलं... गहीरं..अन समंजस.....अशी सांभाळणारी.. सावरणारी ती असताना पर्वता तुला रे कसली काळजी..... तु निर्धास्त कोसळ.. ती आहेच पोटात घ्यायला सारं...... बरच काही दडवलेलं..लपवलेलं असत रे तिने.. अन म्हणूनच लोकं पर्वताला नाही तर दरीला घाबरतात..बहुदा..

No comments:

Post a Comment