Friday, March 22, 2013

कृष्ण वाचताना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या स्त्रिया मनात नकळत घर करून जातात...राधा,द्रौपदी,कुंती... आणि रुक्मिणी? महाराणी रुक्मिणी..द्वारकेची राणी... कृष्णावर निस्सीम प्रेम करणारी.. भर स्वयंवरातुन पळवून आणलेली रुक्मिणी.... मला नेहमी प्रश्न पडतो की रुक्मिणीला राधेबद्दल काय वाटत असेल? कुतूहल? की असूया? कणखर, यादवराज जिच्या फक्त उल्लेखाने हळवा होतो त्या राधेचं नेमकं काय चित्र असेल रुक्मिणीच्या मनात?

रारंगढांग

रारंगढांग...उंचच उंच, आभाळाला भेदणारा नितळ अवाढव्य कातळ....ह्या हिमालयातल्या रारंगढांगातुन रस्ताबांधणीची कथा म्हणजे रारंगढांगाची कथा... पाहिलं तर साधं सोपं अन पाहीलं तर प्रचंड गुंतागुंत.. हिमालय म्हटलं की, पांढर्या बर्फाने आच्छादलेले शिखर, रो रो आवाज करत वाहणार्या नद्या, अप्रतिम सौंदर्याने नटलेला परिसर, पण हिमालय म्हणजे अजुन बरंच काही .. सततची बदलती हवा, क्षणाक्षणला रंग बदलता लहरी निसर्ग, जीवघेण्या दर्या हा सुद्धा हिमालयच...ह्या अश्या टोकाच्या बदलांचा मानवी मनावर होणारा परीणाम म्हणजे रारंगढांग.. अन ह्या रारंगढांगाला फोडुन त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द घेऊन ह्या हिमालयात पहिल्यांच आलेला एक सिविलियन ओफ़िसर विश्वनाथ ह्या कथेचा नायक.. सैन्याची शिस्त, अधिकारांची अरेरावी, दरिद्री पण प्रामाणिक तिबेटी कामगार , बेभरवश्या निसर्गाची भीती..सगळ्यांवर मात करत काम पुर्ण करण्याची कहाणी म्हणजे रारंगढांग.. पण ह्या व्यतिरिक्त राहतच काहीतरी, ग्यानचंद म्हणतो तसं " साब ,जब आदमी मर जाता है तो उस का क्या रहता है?... त्या माणसांची राहते फक्त यादगारी.. रस्त्याच्या कडेला फक्त एक सफेद चौथरा..ह्या एका फर्लांगात असे किती तरी चौथरे दिसतील साब..साब हम इतने भी बुजदिल नही। जंग हम ने भी देखी है... पण साहेब लढाईत समोरच्याच्या हातात बंदुक असते तशी आपल्या ही हातात असतेच नं तो तरी मरेल कीवा आपण तरी, पण...पण इथे तर रोजचीच लढाई.. कुठल्या तरी दगडावर तुमचं नाव लिहिलेलं... कुठुन तरी येऊन तो तुमच्या डोक्यावर कोसळेल , बसल्या जागी खेळ खल्लास.. दरडीचं कोसळणं , लण्ड स्लाईड, ब्रेक फ़ेल..काहीही होउ शकतं... एखाद्या वळणावर म्रुत्यु तुमची वाट बघत उभा असेल..पटकन गाडीत चढेल, तुमच्या बाजुला बसेल ,काहीवेळ प्रवास चालु राहिल अन पटकन तो म्हणेल," चलो दोस्त, टाईम खत्म हो गया" आणि मग काय उरतं मागे? चबुतरा...सतलजच्या काठाशी?"

संवाद

संवादाची किती हाव असते रे मनाला...कधी माणसांशी, कधी निर्जीव वस्तूंशी ,तर कधी चक्क स्वत:च्या मनाशी... जरा कुठे संधी मिळाली कि भरकटण आलच...पण तरी गर्दीत जीव गुदमरतो..मग मला सांग ह्या संवादाची नेमकी व्याख्या तरी काय? जे सभोवताली आहेत त्यांच्याशी एका लिमिट नंतर बोलताच येत नाही रे...अस का व्हाव?आणि हे अस बोलन खुंटलं कि घुसमट वाढते..सतत मनावर काही न काही उमटत असत... भल बुर काहीपण..अन हे काहीपण कोणाला तरी सांगून तपासून बघायची असते मनाची लवचिकता ...पण हे तपासून बघन हि योग्य ठिकाणी असायला हव न? गर्दी खुपते ती इथे.. अन साचत जात सगळ तळाशी.. जीव अडकतो तो इथे....माणसाने प्रक्टिकल असाव म्हणजे असे प्रश्न बोचत नाही म्हणे ... हम्म.. संवेदना माराव्याच लागतील आता बहुदा...

प्रिय मित्रा,

प्रिय मित्रा,
खरंतर लाडक्या म्हणणार होती, पण तुझ्या बाजूच्या 'तीचे' अन माझ्या बाजूच्या त्याचे वटारलेले डोळे आठवले आणि प्रिय वरच थांबले.. हो हो तुझ्या डोळ्यात दिसतेय मला उत्सुकता, आता पत्रात बित्रात वगैरे काय लिहितेय हि पोरगी? पण खरंतर तुला कळलय माझ्या मनातलं.. हे पत्र वगैरे फक्त सगळं तपासून चाचपून बघण्याचा जरिया रे .. 
हम्म.. तर कधीपासूनची ओळख आपली? बालवाडी( हो तेव्हा तेच होतं नं)? की ५वि तली रे ? बघ आता तर आठवत पण नाही.. हो पण एक आठवण मात्र ताजी आहे हं अजून.. एक नवीनच फ्याड काढलं होतं आपल्या हेड बाईंनी, काय तर म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी असे एका बेंचवर बसा त्यामुळे मुलं दंगा कमी करतील( यड्च्याप इय्डीया).. अन तू आलास नं माझ्या बाजूला. आम्हा मुलीचा ग्रुप चार टोकाला चार असा विभागाला गेला त्यामुळे नाईलाजनेच तुझ्याशी बोलणं आलं.. बाईचं डोकं सोलीड हं.. खरच वर्ग काही दिवस शांत होता.. पण त्या काही दिवसात मला मात्र मित्र मिळाला.. आजवरच्या माझ्या नात्यांच्या परिभाषेत एक नवीन नातं....परीक्षा अभ्यास ह्या चक्रात कधी १०वी आली कळलंच नाही... शाळा सुटणार ह्या हूरहुरीसोबतच आता हे मित्र मैत्रिणी असे रोज भेटणार नाहीत ह्याची घालमेल जास्त होती हो नं ?...
शाळा संपली अन कोलेज आलं.. पहिल्या दिवशी तू नव्हतासच सोबत माझ्या...थोडी घाबरेली मी वर्गात शिरले अन सेनिओर्स च्या रगींग ची आयती बळी ठरले अगदी रडायला टेकले होते रे त्या प्रकाराने...अन तू दिसलास.. नव्या चेहर्यात नवा मित्र.. तुझ्यासारखाच... हायसं वाटणं म्हणे काय ते कळलं मला त्या दिवशी..इतक्या बेमालूमपणे मला सोडवलसं त्या तडाख्यातून..मानलं बोस तुला..
"नवा चेहरा, नवा तू.. तरी असा कसा रे अगदी ओळखीचा?" पहिल्याच भेटीत क्याण्टिन मध्ये मी तुला विचारलं.. तू हसलास खळखळुन, अन म्हणालास "अगं सखे, मित्राची ओळख अशी नव्याने थोडीच होते? हा आता चेहरे अनेक भेटतील पुढेही पण मी सोबत असणारच" .. हम्म. तेही खरच म्हणा...तो बराच काही बोलत होता मी मात्र त्या सखीमधेच घुटमळलेली .. नाळ इथेही जोडली होतीच म्हणायची..
हो ..हा हा म्हणता तेही वळण आलाच आपल्या नात्याला... प्रेम.. कोलेज मध्ये अवतीभवती इतक्या जोड्या बघत होती न कि वाटायचं माझ्यापण प्रेमात पडावं की कोणी.. तुला सांगितलं नाही कधी पण मला नं तो आवडायचा.... त्यानेपण माझ्या प्रेमात पडावं म्हणुन काय काय केलं रे मी.. आता हसायला येतं पण तेव्हा तुझा राग यायचा तुला काहीच कसं कळत नाही म्हणुन.. कित्येक दिवस आपण बोललोच नव्हतो रे तेव्हा... मग माझी चिडचिड, त्रागा, अन हा राग काढायचा तरी कोणावर? तू तर नव्हतासच.. अन
अन तेव्हाच माझी ती अगदी खास मैत्रीण ( हो खासच.. हसू नकोस असा) मला म्हणाली अग तू त्याच्याच प्रेमात पडली आहेस.. म्हणजे तुझ्या हं.. काहितरीच काय ? अस्सं डोकं सट्कलं होतं नं.. उगाच आपलं तिला लेक्चर दिलं दोस्ती दोस्ती होती है असं काही नाही आमच्यात.. ब्ला ब्ला ब्ला.. पण खरं सांगायचं तर दोन मिनिट्स मीपण चरकलेच.. खरचं प्रेमात बिमात तर नाही नं पडले तुझ्या.. अन नेमका त्यादिवशी संध्याकाळी तू घरी आलास देवदास बनून..तुझा पडलेला चेहरा अन मी हसतेय वेड्यासारखी .. तुला सांगितलं होतं तरी तू आपला तिच्या मागे.... हसू नाहीतर काय करू.. दुपारचं भूत एव्हाना उतरलं होतंच .. त्यामुळे माझं हसू दाबत कसबसं तुला हसतं केलं.. गंमतच होती रे ती एकुण.. तुझ्या पहिल्या प्रेमभंगाची ( अजूनही हसू येतंय मला)... प्रेमबीम करण्या इतपत मोठे झालो होतो म्हणजे आपण.. मजाच आहे रे..
बघता बघता कोलेज संपलं, नोकर्या लागल्या.. भेटणं कमीच होत गेलं हळुहळु .... हो पण गरजेच्या वेळी हक्काची हाक मात्र तुलाच मारली नेहमी.. घरी लग्नाचे विषय व्हायला लागले.... त्यातूनच हा माझा नवरा निवडला.. कसली धाक धुक होती मनात.. तुझं मत घ्यावं तर तू तिकडे परदेशात.. (तेही गरजेचं होतं म्हणा).. पण तरी मला तू तेव्हा हवा होतास रे.. लग्नात आलास म्हणा अन ह्यांच्या सोबतच्या पहिल्याच भेटीत मला कानात सांगितलास.. सखे सुखी राहा बाळा.. नातं किती चटकन बदललंस रे.. अख्ख्या लग्नात राबराब राब्लास ... अन त्यानंतर मात्र माझ्या संसारतुन अलगद बाजूला झालास( असं तुलाच वाटायचं हं.. कारण आमच्या पहिल्याच भेटीत मी ह्यांना अट घातली होती तुझ्या मैत्रीची.. ) दिवस सरले .. तुही घरवाला झाला .. तुझी तीही तशी छान आहे रे.. स्वीकारलं मला सहज तुझी मैत्रीण म्हणून... गुरफटलो एकंदरीतच ह्या सगळ्या व्यापात..
आता उत्तरार्धात मात्र तुझी वरचेव?र आठवण येते रे ... तुला फोन करून न बोलताच ठेवून देते ते ह्यामुळेच...तुला कळतयं नं रे... तशी सुखी आहे रे मी ... नवरा अगदी लाखांत एक .. सगळे लाड पुरवतो , मुलं हुशार आणि गुणी ( मोठा यु.एस. ला असतो म्हट्लं)... माझा जोब, माझं घर, माझे लोकं .. ह्या सगळ्या माझेपणात छान रमलेय.. पण.. हम्म "हा पण मोठा वाईट गं वेडाबाई, नसतं ह्यात गुंतायचं" हेच म्हणालास नं आत्ता मनातल्या मनात ?..नाही रे सुटत हा पण.. सगळं असुनही नेमकं हरवल्याची जाणीव होतेय.. असं सुख चारही बाजूंनी ओसंडुन आलं नं की श्वास गुदमरतोय माझा ..तुझं होतं का रे असं कधी ? सुखाची अलर्जी झालेय का रे मला? भिती वाटतेय मला.. तुलातरी कळतेय नं रे ही भिती? ..कारण काळ सरकला ,चेहरे बदलले, तसा प्रत्येक वळणावर तू नव्या रुपात भेटतच आलास मला ..त्याच नात्याने.. मित्राच्या नात्याने .. कधी आधाराला, तरी कधी सावरण्याला तुझी सोबत होतीच... हक्काची सोबत...हो नं?
बघ असं होतं हल्ली माझं ..आपलीच रडकी कहाणी सांगत बसली.. तू कसा आहेस?, घरी कसे आहेत विचारलं पण नाही.. रागावणार नसशील तर अजून एक विचारू? जितका सहज तू मित्र झालास तशी मी तुझी मैत्रीण झाली का रे? इतका सगळा फाफट्पसारा लिहिला.. हा सल लिहायला मात्र तळ गाठावा लागला..

तशी उत्तराची घाई नाही.. अपेक्षा तर नाहीच नाही.. पण तरी.. वाट बघतेय..तुझ्या हाकेची

तुझी सखी..

Sunday, January 6, 2013

रोजच्या सरळ्सोट रस्त्यावर चालता चालता अचानक ठेच लागावी तसं कहीसं गाण्याच्या बाबतीतही होत असावं.. नाहीतर असंख्य वेळा ऐकलेल्या गाण्याच्या एखाद्याच ओळीशी मन असं अचानक का थबकावं??एखादा सुर, एखादीच ओळ, कींवा एखादा शब्दसुद्धा एक निराळाच अर्थ देवुन जातो... आजवर न उलगड्लेला.....
"कधीतरी आम्हा सगळ्याना घेउन चल नं रे घरी.. की आई ओरडेल मैत्रीणीना घरी नेलं तर??हा हा हा.. अरे बोल नं.." " नाही म्यड़म कोणी नाही ओरड्णार, आईच नाही मला, पण तुम्ही या घरी "... श्या कधीतरी बोलता बोलता नकळत समोरच्या व्यक्तीच्या जखमेवरची ही अशी खपली निघते.... काळजात उठलेली कळ त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतानाही हसत हसत तो विषयाला अशी काही कलाटणी देतो की आपण आवाक..... असे बोचणारे सल कसे सांभाळायचे???
उगाचच मनावर मळभ दाटून आलेलं असताना..... अस्पष्टशी हुरहूर नकळत ठळक होत जाताना.... खोलवर आत खळबळ माजली असताना... शफल मोड वरच्या गाण्यामधून नेमक गाणं वाजाव... अन डोळ्याni अचानक ओलसर होऊन जाव.. उगाचच???