खूप मेहनतीने, दमत भागत, अगदी जीव गोळा करुन उंचच उंच शिखराच्या शेवटच्या टोकाशी पोहोचाव अन नेमक त्याच क्षणी पायाखालचा दगड खळकन निसटून पुन्हा पायथ्याशी याव... असच काहीस होतंय..
तिला नं सुगंधाचं भारी वेड... पहाटेच्या दवात न्हालेल्या ओंजळभर पारिजातकाचा केशरी रंग त्याच्या मोहक गंधाबरोबरच तिच्या मनावरही चढायचा... देवघरातल्या धुपाचा , आजी उगाळत असलेल्या चंदनाचा, दुर्वांचा,बेलाचा...कशा कशाच्या म्हणून सुवासाने दरवळलेल्या पहाटघरात ती खुळ्यागत बहरायची....नव्या कोर्या वह्या पुस्तकांचा गंध तसा आता मागे सुटला पण त्याची जागा घेतली ती स्वयंमपाक्घरातल्या सुगंधि खजिन्याने.... ताजी ताजी कोथिम्बिर,लाल तिखट कांदा, हिरवागार कढीपत्ता.. निरनिराळे मसाले.... चरचरीत फोडण्या... कितीतरी हवेसे अन नकोसे वास भरलेली हि खोली...आईच्या मागे मागे फिरता फिरता आताशा तीही रमायला लागली ह्या नगरीत... पण संध्याकालि मात्र जराशी हिरमुसायची ती.. दुपारच्या खरपूस उन्हाच्या गंधानंतर उतरत्या सांजेचा हा उदास आसमंत नाही आवडायचा तिला..रात्रीची मात्र ओढ असायची तिला..त्या रातराणीच्या गंधासाठी...तिच्या सोबत मात्र पुन्हा बहरायची ती... तृप्ततेच्या आनंदाने पुन्हा कळिगत मिटायची ती.. पुन्हा उमलण्यासाठि.. खरचं गंधवेडी होती ती..
एक भलाथोरला वाडा .... मजबूत दगडी बांधकामाचा... त्याच्या पोटात तुळशीवृन्दावानाचा आखीव रेखीव चौक... सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात न्हालेला...त्याच्या चारही बाजूना नुकतीच स्वछ पाण्याने धुतलेली काळ्या कातळाची ओसरि... एकीकडे पितळी कड्यांची बंगइ... अन त्यावर ताजी ताजी चांगली ओंजळ भरून मोगर्याची फुल...
हे असाच काहीतरी एखाद्या फोटोफ्रेमसारख डोक्यात उतरतंय...गेले कित्येक दिवस..
"तुझ्या माझ्या घराघरात वावरणारी गृहिणी म्हणजे मध्यमवर्गीय गार्गीच ना गं? अत्यंत हुशार,कर्तबगार अन तरी संसाराला जखडलेली?"
काल संध्याकाळी टीव्हीवर कुठल्या तरी प्रोग्राम मध्ये ऐकलं हे वाक्य.. हि पुराणातली गार्गी म्हणजे हुशारीचं , बुध्हीमत्तेचं प्रतीक...गुहिणी पण अशीच ना गं? सगळ्याच काही उच्चशिक्षित नसतीलही पण कागदावरच्या डिग्र्यांपेक्शाहि १० पात जास्त काही येत असतं त्यांना.. ८ तास काम करून पगार आणणार्या उच्चपदस्थ मेनेजरइतकच काम हि गृहिणी २४X७ करत असते त्याचं भान तरी असतं का रे आपल्याला ? त्याच्या एवढच शिकलेली असताना ही निव्वळ संसाराची गरज म्हणुन स्वखुशीने ती हे गृहिणीपद सांभाळते तेव्हा तिचा आदर करायचा कि तिला महत्वाच्या निर्णयात डावलय्चं? ... मला मान्य आहे कि बर्याच घरात आता असं चित्र नसेलही ... पण तरी आपल्या आईचा जोब जेव्हा मुलांसाठी गोसिप्चा विषय होतो तेव्हा ह्या गार्गीची घुसमट खुपते...जेव्हा तुझी बायको घरीच असते? ह्या प्रश्नावर नवरा खाली मन घालून हो म्हणतो तेव्हा ह्या हुशारीचा अपमान होतोच..... नाही का?
काल महेंद्र काकांच्या ब्लोग वरची ताजी पोस्ट वाचली.. क्षमा...अजून डोक्यात घुमतेय.. आशय असा होता कि आयुष्याश्याच्या उत्तरार्धात जरा निवांतपण मिळालं की मन भूतकाळात डोकावतं... आनंदाचे, सुखाचे, दु:खाचे, अपयशाचे असे कित्येक क्षण सापडतात तिथे.. अन कधीतरी नकळतच का होईना पण काही क्षण पश्चातापाचेही दिसतात... कदाचित मनाच्या तळाशी ती बोच कायम असतेच.. कधीतरी आपण कुणाला तरी दुखावलेलं असतं... कुणाच्यातरी डोळ्यातल्या पाण्याचं कारण आपण असतो, रागाच्या भरात कोणाचा अपमान झालेला असतो... तेव्हा कळत नाही अन जेव्हा चूक उमगते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.. कधीकधी तर ज्याची माफी मागावी तोच ह्या जगात नसतो..तेव्हा उरते फक्त आयुष्यभराची बोचणी.... ह्या माफीचं खूप मोठं ओझं असतं दोस्तहो... उगाच कोण काय म्हणेल, माझा इगो मला परवानगी देईल का? ह्या भानगडीत पश्चाताप नको नं व्हायला हो नं? आज होळी.. सब गिले शिकवे दूर हो जाये दोस्तो.... बस एक मेसेज, एक काल, या फिर एक मुलाकात.... कुछ पुराने रीश्तोको एक मौका तो देके देखो.... शायद दिल को कुछ सुकून मिले जाये..