एखादं उनाड, मस्तीखोर पोर असतं नं, खूप दंगा करणारं... त्याची आई अगदी साधी, सोशिक.. अन बाबा आतून प्रेमळ पण बाहेरून खूप कडक, रागीट...आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हे लहानसं पोरगं दिवसभर उंडरत असतं.इकडे जा,तिकडे काहीतरी कर, एक ना दोन असंख्य खोड्या.... पण बाबा येईपर्यंतच हं.. ते आले कि सगळं चिडीचूप... पण आज अचानक काय झालं की बाबा जर लवकरच आले ऑफिस मधून, अन बघतात तो काय,दिवसभर खेळून भटकून कळ्कट्ट झालेला आपलाच मुलगा.. जाम चिडले ते.. तसाच फरफटत परसदारात नेउन.. स्वछ आंघोळ घातली.. सोबत आईला ओरडा होताच असं कसं लक्ष देत नाही म्हणून .... अन मुलाला पण चोप देण सुरूच.. बरेच दिवसांनी लाडक्या लेकाला मनसोक्त आंघोळ घालूनच शांत झाले ते..
आज अचानक आलेला मुसळधार पाउस मला असा दिसला.. आभाळबाबा अन धरणीमायेचा लेक हा निसर्ग मस्त चकाचक झाला.. घाबरला होता तोही जरा.. अवेळी आलेला बाबा नं.. अन पार्श्वभूमीला आभाळबाबाचा गडगडाट अन विजांचा मार होताच भीती घालायला... आई मात्र हासता होती.. दिलखुलास..

No comments:
Post a Comment