तुला माहीतेय,एकवेळ अशी होती की कळपाच्या बाहेर राहून जीव घुसमटायचा माझा..सतत कोणाचीतरी सोबत हवी असायची...एकटं पडण्याची भीती ठोका चुकवायला पुरेशी असायची ... अन आता....आता शोधत असते पळवाटा .. गर्दीत असली नं की श्वासही असहकार पुकारतात हल्ली...तो मीपणाचा कोष आजकाल वरचेवर पुन्हा पुन्हा खुणावतोय... परतावं का मी ?
मला नं हा असा पाउस पण आवडतो... नुसता ऐकु येणारा...काळ्याकुट्ट अंधार्या रात्रीचा काजळकाळा पाउस... डोळे बंद करुन फ़क्त ऐकत राहावी ही... निसर्गाची रागदारी...
मला नं हा असा पाउस पण आवडतो... नुसता ऐकु येणारा...काळ्याकुट्ट अंधार्या रात्रीचा काजळकाळा पाउस... डोळे बंद करुन फ़क्त ऐकत राहावी ही... निसर्गाची रागदारी...
गिली मिट्टी की सौंधी खुशबू में लिपटे ऐेसे कई अनगिनत ख्वाब युंही बिखेर जाती है बारिशें..हरसाल... चलो इस बार उन्ही ख्वाबोंके कुछ बीज उसी गिली मिट्टी मे बोके देखते.. ख्वाहींशोंकी फसल शायद इस साल अच्छी आ जाए...
सरळ साधं सुतासारखं नातं अधुनमधुन डोरावणार्या गाठींशी अडकायला लागलं नं की संपतच रे सारं.. नंतर सुरू असतो फक्त लपंडाव.. मुखवट्यांचा..आपलंही तसंच काहीसं झालयं का रे?
No comments:
Post a Comment