गच्ची आणि उन्हाळा... कूछ खास रिश्ता ही दोस्तो.... रणरणतं उन, घामाच्या धारा,परिक्क्षांचं ओझं.. ह्या सगळ्यात काही मोजक्याच गोष्टीची वाट बघितली जायची.. त्यातलंच एक म्हणजे गच्चीवर झोपणं.. होळी झाली कि सुरु व्हायची आमची भुणभुण आईच्या मागे ... पण परीक्षा आटोप्ल्यशिवाय ती कसली दाद देतेय आम्हा पोरांना..अन शेवटच्या पेपरच्या काही दिवस आधी मग ती आमच्या नकळत गच्ची साफ करून घ्यायची .... नको असलेलं सामान, कुलरचे पार्ट्स , रंगांचे डबे डुबे अंगणात दिसले कि एक हुरूप यायचा.. न त्याच आनंदात शेवटचा पेपर एकदम मस्त जायचा..अन मग सुरु व्हायची तयारी गच्चीवर झोपण्याच्या सोहळ्याची....दिवसभर टळ्टळित उन्हामुळे घरात डांबले गेलेली आमची बच्चेकंपनी उन्हं उतरायला लागल्या बरोबर बाहेर धूम ठोकायची.. मनसोक्त पळापळि झाली कि आमची टोळी गच्चीवर पळायची.... दिवसभर तापलेल्या गच्चीवर पाय भाजायचे पण त्या उत्साहात त्याचं काय? ह्या गरमागरम गच्चीवर मग पाणी शिंपलं जायचं... त्या बिचार्या गच्चीवर कमीच अन आमच्या अंगावरच जास्त असायचं पाणी... हि अशी छान शिम्पलेली गच्ची मग थंड होऊ द्यायची.. तोवर मागच्या अंगणात पाणी मारायचं.. कारण उन्ह्याल्यात रात्रीचं जेवणपण असच मागच्या अंगणात... मस्त अंगात पंगत बसायची... आंबट कैरीसोबत सुरु व्हायचे प्लानिंग रात्री जागवाय्चं.... जेवणं आटोपली कि बाबांसोबत गाद्या गच्चीवर नेण्याचा प्रोग्राम.. इतकेदा खालीवर करून तेव्हा पाय नाही दुखायचे पण.. गाद्या पसरून ठेवायच्या अन चुपचाप खाली यायचं.... आता गाडी वळायची ती आईस्क्रीम कडे..... आईस्क्रीम खाउन होईपर्यंत गच्चीवरच्या गाद्यापण वार्याने मस्त गारेगार झालेल्या असायच्या..... गुडुप अंधार असायचा.. आणि सुरु व्हायच्या भुताखेताच्या गोष्टी.. एकदम होरार अन सस्पेन्स असलेल्या.... गोष्ट ऐन रंगात आली असताना चुकून जिन्यावर जर कोणाची पावलं वाजली तर सोलिड फाटायची एकेकाची...पण तरी पुढे काय हा प्रश्न असायचा.... माहित नाही कसा पण ह्या गोष्टीचा अनलिमिटेड साठा आम्हा प्रत्येकाकडे असायचा..रात्रभर पण पुरेल इतका.. पण खालचं आवराआवर करून आई बाबा गच्चीवर आले कि नाईलाजाने झोपावं लागायचं.. काळ्याभोर आकाशाखाली त्या चांदण्या मोजत मोजत लागलेली शांत झोप आता ए.सीत सुद्धा लागत नाही..
No comments:
Post a Comment