Wednesday, June 26, 2013

इकडंच तिकडंच

आज सकाळी सकाळी एक साक्षात्कार झाला मला... एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जीजान एक करत असतो.. खूप मेहनत घेत असतो.. पण तरी ती गोष्ट साध्य होत नाही..अस का? तर जी गोष्ट आपण मिळवण्यासाठी धडपडत असतो नेमकी तीच गोष्ट आपल्याला मिळू नये म्हणून कोणीतरी खूप धडपडत असत... बस... कधी तो कमी पडतो तर कधी तुम्ही.. फरक इतकाच कि त्याच्या मेहनतीची,धडपडीची तीव्रता कधी कधी काळात नाही... बाकी Its merely a game of positive and negative efforts... Which part is heavier is result of the game..... So enjoy being in game...

काही नात्यांचे धागे असतात असेच सुटे सुटे .. एक बाजू मनात बांधलेली.. फार घट्ट नाही.. अन खूप वरवरची पण नाही... बस्स असणं महत्वाचं ठरतं काही नात्यांसाठी..... कधीतरी जुळून येण्याच्या अपेक्षेत आजही सुटीच राहिलेली काही अनामिक,समंजस नाती...

गिले ख्वाब यु हथेली पे ना सजा ए राही...क्या पता..अगली हि मोड पे शायद तुफ़ानोसे हाथ मिलना पडे...

कांच के डिब्बीया मे बंद हजारो ख्वाहिशे... दिखाई तो देते है उनके अगिनत रंग....बस मेहसूस नही होता वो उनके होने का एहसास...

उर फुटेस्तोवर पळायचं इथे बस्स.... ध्येय बिय सब झूठ रे..बस रेस में होना मंगता... जिंकणं वैगरे नशिबाच्या गोष्टी बॉस.. पण टिकणं महत्वाचं ... उगाचच आपलं ध्येय गाठायचंय ...मुझे मेरी मंझिल पानी है वैगरे च्या नादात मुळ प्रवाहाच्या बाहेर पडलो नाही म्हणजे मिळवलं रे ..जिवाच्या आकांताने ह्या अश्या पळण्याला जर जगणं म्हणायचं तर कठीण आहे बाबा .... कारण असं पळता पाळता एखाद्या तरी वळणाशी जोरदार कोलमडतोच.. अन अस ठेच लागून कोलमडलं कि जोर जोरात बाहेर येणारा आपलाच श्वासही अनोळखी भासतो म्हणे..सोच लो ...बाकी इस रेस में तो भागना है हि....

एखाद्या व्यक्तीला आपण आदर्श मनात असतो... तिचं वागणं, बोलणं, चालनं.. जस्ट अमेझिंग.. आणि आपल्याही नकळत आपण त्याच्या सारखाच वागत असतो... अन सहजच एक दिवस त्या व्यक्तीबद्दल अस काही काळात कि ती एकदम सामान्य वाटू लागते.. आपल्यासारखीच.. नाही तिचं मोठ्ठं होणं नाही कमी होत... बस तूच सामान्य असणं जाणवायला लागतं.. . पण म्हणून आदर्श बदलतो?

लिहिता लिहिता अलगद घरंगळावा नेमका शब्द अन तरी उमटत जावी एकच अर्थ नसलेली अखंड ओळ...तसा तू... अर्थ नसलेला.. अखंड....तरी अगदी नेमका...

आपण स्वत:च आपली एक वाट निवडतो... खड्तर.. हटके....बिकट..अन अशीच बरीच काहीशी....अगदी जिद्दीने ती वेगळी वाट कापायला सुद्धा लागतो...पण नेमक्या त्याच क्षणी बाजूने कोणीतरी सुळ्ळ्कन आपल्या समोर निघून जातो... त्याच त्या गुळगुळीत झालेल्या,वर्षानुवर्षे सगळ्यांनी वापरलेल्या, प्रत्येक वळणावर गाईड करणार्या वाटेवरून.. काय वाटत हो अश्यावेळी? जेलेसी? पश्चाताप? रेग्रेट? का नेमकं? ध्येय दोन्ही वाटांनी मिळणारच असतं... मग हा नव्याकोऱ्या वाटेचा अटाहास का? वेड ह्यालाच म्हणतात बहुदा... असामान्य लोकांचं समान वेड..(हटके करण्याचा अट्टाहास नाही दादा जिद्द असते... ती नवी कोरी वाट मनाला खुणावते अन tya वाटेने ध्येय मिळतेहि.. पण त्या एका क्शनाचं काय? यशाचे मार्ग बरेच असतात... मग आपला मार्ग नवा असताना चुकीचा तर नाही हा संभ्रम मनात येण चुकीचं तर नाही नं? मला तेच म्हणायचं आहे.... मळलेल्या घासुन्घासून गुळगुळीत झालेल्या वाटेवरुन जेव्हा कोणि आपल्या समोर जातो तेव्हा द्विधा मनस्थिती होणे svabhavik नाही का? हाच क्षण महत्वाचा... बरेच जन तिथूनच परततात न नेमके पुढे जातात)


चांगला भरभक्कम पैसा कमवत असतानाही लोक बेसिक गोष्टींसाठीसुद्धा का कंजुषी करतात? कष्टाचा,मेहनतीचा पैसा वैगरे ठीक आहे हो पण म्हणून लहान लहान गोष्टींसाठीसुद्धा मन मारायचं? का? कशासाठी? ऐशो आराम, चैन कोण करायला सांगताय?बस जे सहज शक्य आहे ते तरी उपभोग... सोबतच्या मित्रालाही द्याव लागेल म्हणून स्वत:साठीसुद्धा चोकोलेत न घेणारे बघितल कि वाईट वाटत..

No comments:

Post a Comment