Wednesday, June 26, 2013

देवा

देवा,
कसा आहेस बाबा? ठीक नक्कीच नसशील.. तेव्हढा दगडाचा नाहीस नं अजून तू... तुझ्याच त्या केदारनाथात काय चाललाय दिसतंय नं रे तुला? तुझ्या दर्शनासाठीच आले होते हजारो लोक देशाच्या कानाकोपर्यातून... तरी बघतोय नं त्यांचं काय झालाय? किती लोक त्या मलब्याच्याखालि समाधिस्थ झालेत तुला तर ठावूकच असेल... असो... जाब वैगरे नाही विचारायचा तुला... आणि विचारायचा तरी कुठल्या तोंडाने विचारू रे? आमचीच कारणी आम्हाला भोगावंच लागेल नं.... तरी मला सांग तू नेमका राहतोस कुठे रे? म्हणजे लहानपणापासून आम्हला शिकवाल जातं कि देव ( म्हणजे तू) सगळ्यांमध्ये असतोस. देवळात असते ती तुझी फक्त मुर्ती.. संकटात तू मदतीला येतो म्हणे ते पण मानवी रूपातच बहुदा.. म्हणजे असं सगळे मोठे लोक सांगायचे...मग तरी केदारनाथला असं का झालं? देशभरातल्या काही मोजक्या ठिकाणी तुझं वास्तव्य कसं रे? आणि मोजकं म्हणून तिथे वाट्टेल तशी गर्दी... भक्तीला ना नाही रे.. पण हि अशी अघोरी भक्ती? तुझा जीव नाही का रे घुसमटत.... असेलच म्हणा.. निसर्गात रमणारा तू.. त्याचीच नासधूस करून आम्ही तुझ्या घरांचा बाझार मांडला... तुझा राग साहजिक आहेच.. आज त्या अलक्नंदचा प्रवाह जागोजागी अडवला म्हणून ती बेभान झाली .. वाट फुटेल तिथे पळाली ... ज्या हिमलायाचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे त्यालाच कोरून कोरून आम्ही पोकळ केलाय .. चुकतोच रे आम्ही..पुन्हापुन्हा .... मरणांचही राजकारण करणार्यांची जात आमची ... अख्खा हिमालय प्लस्टिक्ने झाकायला कमी करणार नाही हे लोक...निसर्ग जपणाची तुझी साधी इच्छा कळत का नाही रे आम्हाला ? 
जाऊ दे सोड .. तू तरी कोणाकोणाला सुधरवणार? असो.. जे झालं ते झालं... paN निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तुझ्यावर पुन्हा अशी अघोरी वेळ न येओ हेच मागणं.. पुन्हा

No comments:

Post a Comment