आठवण..आठवण म्हणजे असतं तरी काय रे... घडून गेलेल्या एका क्षणात असंख्य ठोक्यांचं विनाकारण गुंतणंच ते ..भलं बुरं असं बरंच काही असतं त्यात..आठवतं मात्र जे नेमकं असतं तेच..तुला गम्मत माहीतेय, काही आठवणी नं ह्या पल्याडच्या असतात जरा वेगळ्या..काळाच्या ओघात आपण त्या विसरत असतो किंवा त्या प्रयत्नात तरी असतो..आणि एखाद्या गाफील क्षणी त्या अश्या अचानक समोर येतात...भांबावतं रे मन...अन् शरमतंसुद्धा..मग लागतं स्वतःला कोसायला..जे विसरायचं ठरवलं होतं ते विसरलोच कसं म्हणत जळत राहातं..आठवणी तर ह्याही असतातच नं आठवणीने विसरायच्या तरी आठवणीत जपलेल्या..
लपाछपीचा खेळ तर सूरुच आहे अव्याहतपणे.. अजूनही..फक्त डाव कोणावर अन् लपतोय कोण कोणापासून हेच कळत नाहीये..की एकच आहेत रे दोघंही..नियतीकडे पाठ करुन आपल्याच नादात म्हणतोय आपण १०,२०,३०...१००..येउ का?आपल्यातच लपलेल्या मीपणाला शोधायला...अन् एका गाफील क्षणाला नियती म्हणते ये..अन् निघतो आपण शोध तसाच अर्धवट टाकून...डाव पुढच्या जन्मावर ढकलून..
खोल खोल तळाशी पक्क ठाउक असतं आपल्याला आपण कोण ते...आपल्या जगण्याचे नियम तिथे आपणच असतात कोरलेले..अन् इमानेइतबारे आपण ते पाळतही असतो..अगदी न चुकता..पण कुठल्यातरी एका वळणावर ह्या खोल तळाशी लक्कन काहीतरी हलतं..एक झुळूक होऊन कोणीतरी त्या तळाचा ताबा घेतं..आपल्याही नकळत..आपलेच नियम आपल्यापुरतं मग बदलत जातात..त्या झूळकेच्या तालावर ठरते श्वासांची लय..अन् काळजाच्या ठोक्यावरही जाणवतं त्याचं अधिराज्य..सवयीची होत जाते मग एक खोलवरची जखम अन् त्यावरचा उतारा...भिनत असतं कोणीतरी रंध्रारंध्रात तरी हवीशी असते ती नशा...ह्या धुंदीवर स्वार होउन मध्यावर येता येता मात्र सवयी काचत जातात..हवेहवेसे उसासे सारे उगा मग टाळले जातात.. हरवलेल्या मीपणाची जाणीव जेव्हा अचानक लख्ख होत जाते.. खोडलेल्या जून्या नियमांचा खडबड्या स्पर्शावर अलगद नवे मीपण कोरले जाते..
अश्या पावसात सकाळ वैगरे होत नसते रे वेड्या..भ्रम आहे तुझा भ्रम..कसंय नं रात्री झोपताना पाउस दिसलेला नसतो नं म्हणून थोडासा उजेड पाडतो देवबाप्पा...डोळे किलकिले करुन खिडकीतून तो बघायचा मनभरुन अन् पून्हा झोपून जायचं..गुडूप..
मनमोहक रागदारीत बरसणारा मंत्रमुग्ध पाउस..
असंख्य संदर्भ असले तरी एकाही स्पष्टीकरणात कधी गुंफताच नाही आलं रे आपलं नातं .. पावसा..

No comments:
Post a Comment