खरंतर फार मोजक्या लोकांना उत्तरं देण्यास बांधील असतो आपण... पण तरी विचारल्या गेलेल्या प्रत्येकच प्रश्नाने मनात काहूर उठणं काही सुटत नाही... नेमकी उत्तरं शोधताना निरर्थक प्रश्नांना सोडून देता यायला हवं बयो..
....................................................................................
मित्रा अंतरं अशी अचानक नाही नं रे वाढत.. कणाकणाने दुरावत असतो आपण एकमेकांपासून.. अन अगदी हाकेच्याही पल्याड गेल्यावर एकदम भानावर येतो.. अंगावर उमटतो शहारा.. भीतीचा.. तुला गमावल्याच्या भीतीचा.. helpless ला मराठीत असहाय्य म्हणतात ना रे.. बरोबरच मग.. तूला गमावल्यावर मागे उरतं ते हेच सोबत नसलेलं ...असहाय्य... एकटेपण....
..................................................................
काहीवेळा टाळता न येणाऱ्या असतात... सांजवेळ हि त्यातलीच एक... मुळात ती हवीहवीशी असते... तिची ती हुरहूर जीवघेणी असली तरी जिवंत असते आणि दिवसभराच्या मरणात ती एक जिवंतपणाची खुण जपावीशी वाटते.... गुजरते वक्त का एक लम्हा चुराना हो तो याकिनन वो शाम होगी...
...................................................................
ह्या अशा जीवघेण्या कळेचे सोहळे साजरे करणारीही जमात असते बायो .. हो जिवंत जमात.. कळ आयुष्याला पुरून उरणारी हवी फक्त अन तिची वेदना मिरवताही यायला हवी.. हो नं ?
.........................................................................
बयो,
. सगळं कसं स्तब्ध... हे भरून आलेलं आभाळ, वाहणं विसरलेला वारा, तेच शहर, तीच घरं, तेच रस्ते अन तीच माणसं.. सगळं तेच.. वर्षानुवर्ष जिथल्या तिथे... कशातच बदल नाही... सवयीचं झालंय आताशा पण तरी एक अस्वस्थता मनात घर करून बसलीय.. आणि त्यात भर म्हणजे कानात रुंजी घालणारं हे गाणं.. दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है... कारणं कळायला हवीत गं.. ह्या अस्वस्थतेची.. ह्या रितेपणाची.. कारणं ह्या जाणिवांची... नाहीतर हे असं नुसतं वेळी अवेळी पाणावणं काही बरं नाही.. खूप जुन्या ओळखीच्या डोळ्यात अनोळखीपण कसं काळजाला हात घालतं तसं काहीसं हे...
बयो, जीव कसा गं जडतो? सवयीतून? सोबतीतून? कि कोणीतरी अगदी आपल्यासारखं असतं, त्या त्याच्या /तिच्या असण्यावर जीव जडतो? हि जाणीवच मुळात विलक्षण असावी नं.. सुखावणारी... मालकी हक्क सांगणारी.. पण मग हक्क संपल्यावर जाणीवही विरायला हवी नं गं ? हम्म.. नाही नं होत तसं.. one way route हा.. परतीच्या पाउलखुणा पुसलेला... वेस हरवल्या गावासारखा वाढता हा जाणिवांचा प्रदेश.. रोज एक नवं झोपडं नव्या जाणीवेचं... पसारा वाढताच... तरी
तुझ्या माझ्यात आत्ता उमटलेली हि अनामिक जाणीव मिटत पाटी कोरी होईल का गं बयो ?
................................................................................