स्तब्ध तळ्याच्या देहावर उठणार्या अलवार तरंगांसारखंही असतं एक नातं .. एका क्षणी थेट काळजात घुसणारं .. ह्या वलयांना जन्म देणार्या खड्यासारखं .. अन् दुसर्याच क्षणी हे सल शिवत पुर्वरत होणारं ... असून नसल्यासारखं क्षणभंगूर तरंगांचं नातं..
...........................................................
अशी एक टळटळीत निवांत दुपार.. काम नसलेली..रिकामी..एखादा बस स्टोप बघायचा.. सहसा गर्दी नसलेला..आणि बसायचं तिथे...दांड्याला रेलून..समोरचा तुरळक गर्दीचा रस्ता न्याहाळत..रस्त्यापल्याड्च्या इराणी हॉटेलचा दुष्ट सुस्त मालक.. पोर्यांवर ओरडणारा...त्यापल्याड कोलेजची एक दोन जोडपी.. एकमेकात गुंग.. कोपर्यावरून वळणारी हिशोब करून घरी निघालेली भाजीवाली मावशी.. पोरांना घरी ठेऊन शोप्पिंग ला निघालेल्या टापटीप तयार गृहिणी.. एक न दोन...तुरळक गर्दीतली नमुनेदार लोकं..मजा असते रे त्यांना असं एका कडेने बघणं.. अरे हो त्यात तुझ्यासारखाही असतो बरं एखादा...एक मिटिंग आटोपून दुसर्या मीटिंग साठी पळणारा...पण मधल्या वेळात .. "च्यामारी, आता पुन्हा तो गर्दीचा प्रवास "म्हणत वैतागत टपरीवर एक कटिंग मारणारा...एखाद्या टकाटक आजी असतात भजनी मंडळाला जाणार्या..रस्त्याच्या कडेने पुटपुटत पण लगबगीनी पावलं उचलणाऱ्या.. तरतरीत आजी.. आणि एक आजोबा पण.. आजीपाठोपाठ घराबाहेर पडलेले.. निवांत..आपल्यासारखेच.. तेही त्या बस स्टोप वर येतात..सहज बाजूला येउन बसतात आपल्या .. "काय रे पोरांनो, काही काम धाम नाही का ?"अस दटावून विचारणारे.. पण खरतरं आयुष्यभर जोब केला असतो नं त्यांनी ..या मोकळ्या दुपारची लज्जत त्यांना नीटच कळलेली असते.. त्यामुळे आपण असे मोकळे बघून असूया वाटणारच.. आपल्या उत्तरावर मात्र जम खुश होतात हं ते "ऑफिस तर रोजच असतं हो आजोबा .. अशी निवांत दुपार अभावानेच कधीतरी मिळते.. हो नं "...इतरवेळी दहा प्रश्न विचारणारे.. शंभर चौकशा करणारे हे अनोळखी आजोबा आता मात्र गप्प तिथून निघून जातात..आपण पुन्हा तिथेच.. रस्ता न्याहाळत..एकही शब्द न बोलता अखंड बोलत असतो आपण.. सतत.. दुपारच्या भाजक्या उन्हात आपल्याशीच संवाद सुरु.. पण कशाच्या तरी सुगंधाने माझी तंद्री मात्र चाळवते.. कसला बरं हा सुगंध.. हा मोगरा.. नाही ...जाई.. नाही रे हा ताज्या गुलाबाचा...संध्याकाळी गजरे विकणाऱ्या मावशी बस स्टोपच्या मागच्या सावलीत गजरे विणत कधी आल्या कळालेलं हि नसतं नं..त्यांची ती तल्लीनता.. एकाग्रता..कामातली लय.. एकेक फुल गुंफतानाची काळजी अन गजर्याची गाठ मारताना चेहऱ्यावरचं सुख.. जगाशी काही देणं घेणं नसत त्यांना.. त्यांचं विश्व त्या फुलांमध्ये..अन आपलंहि...मनभरून फुलांचा टवटवीतपणा अन श्वासात त्यांचा गंध भरून आपण पुन्हा पूर्वरत... ताजे तवाने .. रिकाम्या दुपारची झोळी हवी तशी भरल्याच्या समाधानात..
..................................................................................
घाट चढताना एका बाजूला मोठ्ठा डोंगर अन दुसरीकडे खोल दरी... कधीतरी ह्या दरीत पहुडलेले निपचित गाव....दिवसाच्या कुठल्याही प्रहरी बघा, हे गाव स्तब्धच दिसतं... शांत.. अधून मधून आकाशात झेपावणारा पक्षीच काय तो त्या गावाची तंद्री मोडणारा... रंगीबेरंगी छप्पराआड मात्र असते जाग.. मग्न असतो कोणीतरी नेमून दिलेल्या कामात... रात्रीच्या मिट्ट काळोखात लुकलुकत्या दिव्यातून करत असतं कोणीतरी प्रार्थना त्या आभाळातल्या देवाला... अश्यावेळी काय करावं आपण..तर देऊन टाकावा गं बयो अशिर्वाद...हवे ते मिळू दे.. हे समाधान टिकू दे.. आभाळाकडे लागलेल्या डोळ्यातले देव नसतो गं आपण... दरी ओलांडणारा घाट फक्त आपल्याला आभाळाच्या जवळ नेत असतो... त्या क्षणाला उंचावर असण्याचा अशिर्वाद पोहोचवायला हवा नं आपण.. ज्याचा त्याला...
............................................................................................

No comments:
Post a Comment